Bhagat Singh Koshyari : राज्यपालांचं विधान भांडणं लावण्याचं, व्यापाऱ्यांकडूनही राज्यपालांच्या त्या विधानाचं समर्थन नाही
हे लोक बाहेर गेल्यानंतर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान राज्यपालांनी केलं. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी राज्यपालांवर टीकेची झोड उडवली. त्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण आलं.
मुंबई : राज्यात आजपर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या एवढी कोणत्याही राज्यपालांची चर्चा झाली नसेल, तसेच वादही झाले नसतील. महाविकास आघाडी सरकारच्या काळातला (Uddhav Thackeray) राज्यपाल विरुद्ध सरकार हा संघर्ष संबंध महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बाबतचं राज्यपालांचे विधान आणि त्यानंतर भडकलेले राज ठाकरेही (Raj Thackeray) पाहिले आहेत. मात्र शुक्रवारी पुन्हा राज्यपालांनी एक मोठं विधान केलं आणि संतापाचा डोंब उसळला. मुंबईतून गुजरात आणि राजस्थानी काढले तर मुंबईत काहीच पैसा उरणार नाही. मुंबईला देशाच्या आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र हे लोक बाहेर गेल्यानंतर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान राज्यपालांनी केलं. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी राज्यपालांवर टीकेची झोड उडवली. त्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण आलं. मात्र याबाबत आता मुंबईतल्या व्यापाऱ्यांनीही राज्यपालांचे विधान हे केवळ भांडण लावण्याकरता आहे, असे म्हणत त्याला विरोध दर्शवला आहे.