Eknath Shinde: राज्यपालांनी दिले विशेष अधिवेशन बोलवण्याचे आदेश, सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करावी लागणार, महत्त्वाचे पाच आदेश

राज्यात आता सत्तास्थापनेचा संघर्ष शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. शिवसेनेचे सुमारे 39 आणि 10 अपक्ष आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत असताना, आता सरकार अल्पमतात आले असल्याचे मानण्यात येते आहे.

Eknath Shinde: राज्यपालांनी दिले विशेष अधिवेशन बोलवण्याचे आदेश, सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करावी लागणार, महत्त्वाचे पाच आदेश
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 11:40 PM

मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षाचा क्लायमेक्स आलेला आहे. राज्यपालांनी विरोधी पक्षनेत्यांच्या मागण्यांवरुन राज्यपालांनी सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचे आदेश दिलेले आहेत. सरकारची अग्निपरीक्षा 30 तारखेला होणार असून, सरकारकडे आता केवळ उद्याचा दिवसच उरलेला आहे. गेले अनेक दिवस सुरु असलेला राज्यातील सत्तासंघर्ष आता 30 तारखेला मार्गी लागण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्यपालांनी जे आदेश दिले आहेत, त्यामध्ये सुचनाही दिल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे;

1. 30 ताऱखेला सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशन सुरु होईल आणि पाच वाजेपर्यंत सरकारला बहुमत विश्वास उद्धव ठाकरे सरकारला सिद्ध करावे लागणार आहे. 2. राज्यपालांनी हे पत्र सचिवांना पाठवले आहे. 3. यातील भाषणे छोटी-छोटी असावीते हेही सांगण्यात आले आहे. 4. याचे व्हिडिओ शूटिंगही करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याच दिवशी त्याचा निर्णय घेण्यात यावा. 5. सदस्यांची सुरक्षा सदनाच्या आत आणि बाहेर ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सरकार अल्पमतात

हे सरकार अल्पमतात असल्याचे पत्र फडणवीस आणि काही अपक्षांनी दिलेले आहे. ते पत्र काळजीपूर्वक पाहून, आणि सध्या राज्यात माध्यमांकडून जे कव्हरेज होते आहे, ते पाहिले आहे. ते पाहून असे दिसते आहे की उद्धव ठाकरे यांच्या सरकारने त्यांचे बहुमत गमावलेले दिसते आहे. त्यामुळे आता याचा निर्णय करण्यासाठी 30 तारखेला विशेष अधिवेशन बोलवण्याचे पत्रात सांगण्यात आले आहे. त्या दिवशी सरकारने बहुमत सिद्ध करावे असे आदेशही देण्यात आले आहेत.

भाजपा अखेरीस मैदानात

राज्यात आता सत्तास्थापनेचा संघर्ष शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. शिवसेनेचे सुमारे 39 आणि 10 अपक्ष आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत असताना, आता सरकार अल्पमतात आले असल्याचे मानण्यात येते आहे. आत्तापर्यंत या बंडापासून अंतर ठेवून असलेले भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता यात सक्रिय झाल्याचे दिसते आहे.

फडणवीस आज मुंबईत परतले

देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर, ते मुंबईत परतले. त्यानंतर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांच्यसह इतर अनेक नेते त्यांच्या सागर या निवासस्थानी आले. त्यानंतर फडणवीस आणि सर्व नेते हे राज्यपालांना भेटण्यासाठी गेले आहेत. या भेटीतून फडणवीसांनी राज्यातील सरकार अल्पमतात आल्याचे सांगून राज्यपालांकडे विश्वासदर्शक ठरावाची मागणी केली असल्याची माहिती आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.