Govinda Firing Case : गोळी लागली की मारली? गोविंदाची थिअरी काही पचनी पडेना, चीची भय्या अडचणीत, यामुळे पोलिसांचा बळावला संशय

Govinda Firing Incident Update : बॉलिवूड स्टार गोविंदाकडून भल्या पहाटे चुकून फीस फायर झाले. त्याच्या पायाला गोळी लागली. त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. पिस्तूल साफ करताना ती खाली पडली आणि त्याच्या पायात गोळी घुसल्याचा दावा त्याने केला. पण पोलिसांचा या थेअरीवर काही केल्या विश्वास बसेना.

Govinda Firing Case : गोळी लागली की मारली? गोविंदाची थिअरी काही पचनी पडेना, चीची भय्या अडचणीत, यामुळे पोलिसांचा बळावला संशय
गोविंदा आला अडचणीत
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 5:11 PM

मंगळवारी भल्या पहाटे गोविंदाकडून मिस फायर झाले. पिस्तूल साफ करताना ती खाली पडली आणि त्याच्या पायात गोळी घुसल्याचा दावा त्याने केला. त्याला तातडीने रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले. त्याची प्रकृती चांगली आहे. त्याला सामान्य विभागात हलवण्यात आले आहे. त्याची पत्नी सुनीता आहुजा हिच्या माहितीनुसार, 2 ते 3 दिवसात त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. या घटनेसंबंधी पोलीस घरच्यांकडून तपास करत आहे. पोलिसांनी गोविंदाची मुलगी टीनाचा जबाब पण नोंदवला आहे. पण गोविंदाच्या जबाबावर पोलिसांचा काही केल्या विश्वास बसलेला नाही. त्याची थेअरी पोलिसांच्या काही पचनी पडेना, कारण तरी काय?

हे कारण काही उमगेना

गोविंदाच्या दाव्यानुसार, पिस्तूल साफ करताना ते खाली पडलं नी गोळी सुटून ती गुडघ्यावर लागली. पोलिसांना या जबाबावर विश्वास बसेना. पोलिसांच्या मते, पिस्तूल खाली पडून त्यातून गोळी सुटू शकते. पण रिव्हॉलव्हर पडल्या उभी होऊन त्यातून वरच्या दिशेने गुडघ्या गोळी सुटण्याची किमया घडू शकत नाही. रिव्हॉलव्हर हातात असतानाच गोळी सुटली. मग गोविंदा ही गोष्ट का लपवत आहे? जर खरंच गोविंदा काही लपवत असेल तर मग सत्य तरी काय? अर्थात मुंबई पोलिसांच्या दाव्यात तथ्य तर दिसत आहे.  मुंबई पोलिसांचा अंधारात तीर निघाला आहे. तो सत्यावर जाऊन केव्हा लागेल? हे लवकरच समोर येईल.

हे सुद्धा वाचा

अजून गोविंदाची झाडाझडती बाकी

रुग्णालयात भरती होत असताना पोलिसांनी गोविंदाचा जबाब नोंदवला. पण पोलिसांसमोर अनेक प्रश्न आहे. त्याची उकल गोविंदाच्या मदतीनेच होणार आहे. प्राथमिक इलाजानंतर गोविंदाला आता जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. पण गोविंदा त्याची व्यवस्थित उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे पोलीस त्याचा दुसऱ्या जबाब नोंदवणार आहेत. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, पिस्तूल जमिनीवर पडल्यावर त्यातून वरच्या दिशेने गोळी कशी झाडल्या गेली. हा सवालच पोलिसांना बैचेन करत आहे. आता छोटे मियाची झाडाझडती घेतल्यावरच त्याचे उत्तर मिळू शकते.

या प्रश्नाचे चीची उत्तर देणार?

घटनेवेळी गोविदांच्या पिस्तुलात 6 गोळ्या होत्या. त्यातील एक गोळी चुकून झाडल्या गेली. गोविंदा पहाटे बाहेर जाणार होता. तर मग त्याने पिस्तुलात गोळ्या का भरल्या? त्याने पिस्तुलात सर्वच गोळ्या का टाकल्या? पोलिसांना संशय आहे की, गोविंदा काही तरी लपवत आहे. आता घटनास्थळाच्या पंचनाम्यातून बऱ्याच गोष्टींचा खुलासा होईल. बॅलिस्टिक अहवालातून चित्र स्पष्ट होईल. पण प्रश्न उरतोच, गोविंदा काय लपवत आहे?

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....