Indian Railway : रेल्वे तिकीटचं नाही तर स्टेशनबाहेर तांदळासह पिठाची स्वस्तात करा खरेदी

देशातील विविध महानगरं मुंबई, दिल्ली,बेंगळूरु, कोलकत्ता, चेन्नई येथीलच नाही तर इतर शहरातील अनेक गृहिणींना घर चालविण्यासाठी नोकरी करावी लागते. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर त्या भाजीपाला खरेदी करतात. पण आता त्यांना रेल्वे स्टेशनवरच स्वस्तात तांदळासह पीठ खरेदी करता येणार आहे. काय आहे ही योजना..

Indian Railway : रेल्वे तिकीटचं नाही तर स्टेशनबाहेर तांदळासह पिठाची स्वस्तात करा खरेदी
स्टेशनवर मिळवा स्वस्तात तांदळासह पीठ
Follow us
| Updated on: Apr 07, 2024 | 3:01 PM

Flour And Rice On Stations : तुम्ही अनेकदा सोशल मीडियावर मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांना भाजीपाला निवडताना, खूडताना पाहिले असेल. महानगरातील स्त्रीयांना संसार करताना दुहेरी कसरत करावी लागते. धावपळीत लोकलमध्येच त्यांना घरी स्वयंपाकापूर्वीची कामं उरकून घ्यावी लागतात. मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नईसह अनेक शहरात लोकांकडे वेळेची कमी असल्याने हे प्रकार घडतात. काही जणी वेळेची बचत करण्यासाठी रेल्वे स्टेशनजवळ फुटपाथवरुन भाजीपाला खरेदी करतात. आता रेल्वे स्टेशनवरच गृहिणींना स्वस्तात तांदळासह पिठाची खरेदी करता येणार आहे. त्यासाठी रेल्वे मंडळाने परवानगी दिली आहे.

रेल्वे मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल

रेल्वे बोर्डाने दैनंदिन धावपळ करणाऱ्या प्रवाशांसाठी ही योजना आणली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात देशातील काही रेल्वे स्टेशनवर योजना राबविण्यात येणार आहे. तांदळासह पिठाची विक्री करण्यात येईल. तांदळासह पिठाची किंमत पण वाजवी असेल. रेल्वेने केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्रालयाच्या मदतीने हा निर्णय घेतला आहे. लवकरच देशातील काही रेल्वे स्टेशनच्या बाहेर स्वस्त दरात प्रवाशांना तांदळासह पिठाचा पुरवठा करण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

किती आहे भाव

भारत आटा आणि भारत तांदूळ (Bharat Brand) हे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने भारतात तांदळासह पिठाची विक्री सुरु केली आहे. भारत आट्याची किंमत 27.50 रुपये प्रति किलो आहे. तर भारत तांदळाचा भाव 29 रुपये किलो आहे. पिठासह तांदळाची विक्री रेल्वे स्टेशन बाहेर करण्याची योजना आहे.

3 महिन्यांचा पथदर्शी प्रकल्प

रेल्वे बोर्डाने हा पथदर्शी प्रकल्प सुरु करण्याची तयारी केली आहे. सुरुवातीला हा प्रकल्प केवळ तीन महिन्यांसाठी असेल. जर प्रवाशांनी याला चांगला प्रतिसाद दिला. नियोजन चांगले झाल्यास ही योजना कायमस्वरुपी राबविण्याचा विचार आहे. या योजनेतंर्गत संबंधित रेल्वे स्टेशनवर, एक धान्याने भरलेली एक व्हॅन उभी असेल. या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी दोन तास स्वस्तात तांदळासह पिठाची विक्री करण्यात येईल. तांदळासह पिठाचा दर केंद्र सरकार निश्चित करणार आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....