द्वेषाचं लोण आता थेट मंगल कार्यात; लग्न पत्रिकेवर मोदी-योगींचा फोटोसह छापले ‘बटोगे तो कटोगे’

Batoge to Katoge, Wedding Card : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'बटोगे तो कटोगे' ही घोषणा केली. तर त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है' अशी घोषणा केली. त्याचे पडसाद आता मंगल कार्यातही दिसत आहे. एका लग्न पत्रिकेवरच हा नारा छापण्यात आला आहे.

द्वेषाचं लोण आता थेट मंगल कार्यात; लग्न पत्रिकेवर मोदी-योगींचा फोटोसह छापले 'बटोगे तो कटोगे'
बटोगे तो कटोगे
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 12:01 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटोगे तो कटोगे’ ही घोषणा दिली. गेल्या आठवड्यात वाशिममधील सभेत त्यांनी हा नारा दिला. तर त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है’ अशी घोषणा दिली. या दोन्ही नाऱ्यांनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागले आहे. तर दुसरीकडे द्वेषाचे लोण मंगल कार्यात सुद्धा दिसून येत आहे. एका भाजपा कार्यकर्त्याने लग्न पुत्रिकेवर ‘बटोगे तो कटोगे’ हा नारा छापला आहे. सोबत मोदी आणि योगी यांचे छायाचित्र सुद्धा छापले आहे.

लग्न पत्रिकेवर बटोगे तो कटोगेचा नारा

या लग्न पत्रिकेवर एका भाजप कार्यकर्तेने कटोगे तो बटोगे हा योगी आदित्यनाथ यांचा नारा छापला आहे. गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्याने ही विवाह पत्रिका छापली आहे. महुआ तहसीलअंतर्गत येणार्‍या वांगर या गावात हा प्रकार समोर आला. या लग्न पत्रिकेवर बटोगे तो कटोगेचा नारा छापण्यात आला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही फोटो छापण्यात आला आहे. ही पत्रिका समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे.

हे सुद्धा वाचा

हरयाणानंतर राज्यात भाजपाचा नारा

हरियाणा विधानसभा निवडणुकीवेळी योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रासह झारखंडच्या प्रचारात भाजपने ही घोषणा केली आहे. तर उत्तर प्रदेशातील 9 जागांवर पोटनिवडणुकीतही हा नारा घुमला आहे. महाराष्ट्रात वाशीम येथील सभेत त्यांनी हा नारा दिला होता. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले. आता गुजरातमधील भाजपा कार्यकर्त्याने त्याच्या भावाच्या लग्नपत्रिकेवर बटोगे तो कटोगे ही घोषणा छापली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक है तो सेफ है अशी घोषणा करण्यात आली. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप केला आहे.  हाच मुद्दा आता निवडणुकीच्य रिंगणात गाजत आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.