Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना न्यायलयीन कोठडी पण ताबा सातारा पोलिसांकडे, प्रकरण काय?

गुणरत्न सदावर्तेंना न्यायलयीन कोठडी मिळाली आहे, पण त्यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनावेळी केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी सदावर्तेंवर तिथेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना न्यायलयीन कोठडी पण ताबा सातारा पोलिसांकडे, प्रकरण काय?
गुणरत्न सदावर्तेंनी एकूण किती पैसे घेतल्याची कबुली दिली?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 5:20 PM

मुंबई : गुणरत्न सदावर्तेंना (Gunratna Sadavarte) न्यायलयीन कोठडी (Judicial Custody) मिळाली आहे, पण त्यांचा ताबा सातारा पोलिसांकडे (Satara Police) देण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनावेळी केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी सदावर्तेंवर तिथेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 7 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. इतर दोन आरोपींना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्तेंना एसटी आंदोलनाच्या प्रकरणात जरी थोडा दिलासा मिळाला असला तरी दुसऱ्या प्रकरणात लगेच त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण साताऱ्यांतही त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला आहे. त्यासाठी सातारा पोलीस आधीपासूनच मुंबईत येऊन थांबले होते. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांना देण्यात आलाय. सातारा पोलीस त्यांना आर्थर रोड कारागृहातून घेऊन जातील.

जयश्री पाटील याही सहआरोप

आज न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर  मुंबई पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांना देण्यास हरकत नसल्याचं म्हटलंय, त्यामुळे हा ताबा त्यांना देण्यात आलाय. याच प्रकरणात सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांनाी सहआरोपी केलंय. कट रचणे, आरोपींना प्रोत्साहन देण्याचा जयश्री पाटील यांच्यावर आरोप करण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी वकीलांनी दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू वकील प्रदीप घरत यांनी मांडली आहे. जेव्हापासून हे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन झालं आहे, तेव्हापासून राज्यात जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत. राज्य सरकारने गुणरत्न सदावर्तेंविरोधात दाखल असणारी सर्व प्रकरण बाहेर काढण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे साताऱ्यातल्या प्रकरणात आता त्यांचा ताबा घेण्यात येणार आहे.

साताऱ्यातलं नेमकं प्रकरण काय?

गेल्या अनेक दिवसांपासून गुणरत्न सादवर्ते हे चर्चेत तसेच वादात राहिले आहेत. कारण गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी मराठा आरक्षणविरोधी भूमिका घेतली होती. तसेच यावरून काही वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्याच प्रकरणी साताऱ्यातही गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता हेही प्रकरण पुन्हा गाजण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या एसटी आंदोलनाने सदावर्तेच्या अडचणी चांगल्याच वाढवल्या आहेत. आता साताऱ्यातलं हे प्रकरण सदावर्तेंचा पाय किती खोलात नेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सातारा पोलीस आजच सदावर्तेंना घेऊन साताऱ्याला रवाना होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सातारा पोलिसांची वाहनंही तयार करण्यात आली आहेत.

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा; सातारा पोलीस ताब्यात घेणार?

Jayant Patil : राज ठाकरेंची सभा ही उत्तर सभा नाही तर उतारा सभा! जयंत पाटलांचा जोरदार टोला

खासदार नवनीत राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे वाय प्लस सुरक्षा प्रदान, राणा यांचा VVIP श्रेणीत समावेश

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.