Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांकडून अटक, सरकारी कामात अडथळा, कटात सामील असल्याचा आरोप

गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. सरकारी कामात अडथळा आणला आणि कटात सामील असल्याचा ठपका ठेवत ही अटक झाली आहे. शरद पवारांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी जे आक्रमक आंदोलन केले. त्याच प्रकरणी गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांकडून अटक, सरकारी कामात अडथळा, कटात सामील असल्याचा आरोप
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 10:14 PM

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना (Adv. Gunratna Sadavarte) पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. सरकारी कामात अडथळा आणला आणि कटात सामील असल्याचा ठपका ठेवत ही अटक झाली आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) जे आक्रमक आंदोलन केले. त्याच प्रकरणी गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या आहेत. शुक्रवारी दुपारी जे आक्रमक आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर राज्याच्या राजकारणातला पारा चांगलाच चढला होता. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. तसेच या प्रकरणावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत होत्या. गुणरत्न सादवर्ते यांनी गुरूवारी कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आझाद मैदानात जे भाष्य केलं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना भडकल्याचा आरोप होतं आहे. आझाद मैदानातून त्यांनी बारामतीत येऊन आंदोलन करू आम्हाला थांबवून दाखवा असा थेट इशारा शरद पवारांना दिला होता.

सदावर्तेंना पोलिसांनी का ताब्यात घेतलं ?

  1. मुंबईत पवारांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांचा हल्ला
  2. सिल्व्हर ओकवर चप्पल फेकत संपकऱ्याचं आंदोलन
  3. सदावर्तेंच्या भाषणामुळे पवारांच्या घरी हल्ला, असा पोलिसांचा निष्कर्ष
  4. सदावर्तेंच्या भाषणाच्या क्लीप पोलिसांच्या हाती- सूत्र
  5. दावर्तेंच्या भाषणामुळं संपकरी आक्रमक झाल्याची पोलिसांना शंका

सदावर्तेंवर कोणता गुन्हा ?

  1. कलम 353 आणि कलम 120 ब
  2. कलम 353- सरकारी कामात अडथळा
  3. कलम 120 ब- कटात सहभाग

कोण आहेत गुणरत्न सदावर्ते, 10 गोष्टींमधून समजून घ्या!

  1. गुणरस्त सदावर्ते वकील आहे. त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात कायदेशीर लढा दिला होती. तेव्हापासून ते चर्चेत होते.
  2. एस कर्मचाऱ्यांच्या आंदोलन गुणरत्न सदावर्ते यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
  3. गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडचे आहेत. त्यांचं शिक्षण औरंगाबाद आणि मुंबईत झालं आहे.
  4. वेगवेगळ्या सामाजिक आंदोलनांमध्ये आणि चळवळींमध्ये सदावर्ते यांचा सहभाग असायचा.
  5. सम्यक विद्यार्थी आंदोलन ही संघटना सदावर्ते यांनी सुरु केली होती. या संघटनेच्या माध्यमातून सदावर्ते यांनी विविध विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले होते.
  6. सदावर्ते हे आता मुंबईत वकिली करतात. त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएचडी घेतलेली आहे.
  7. सदावर्ते दोनवेळा मॅटच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत. तसंच ते बार काऊन्सिलच्या शिखर परिषदेवरही होते.
  8. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीचं नाव जयश्री पाटील आहे. त्यांना एक मुलगी असून तिचं नाव झेन आहे.
  9. गुणरत्न सदावर्ते यांनी रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिकाही केलेली होती.
  10. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर 2018 साली हल्लाही करण्यात आलेला होता. मराठी आरक्षणाविरोधातील याचिकेच्या सुनावणीनंतर हा हल्ला करण्यात आला होता. तसंच त्यांना शिवीगाळही करण्यात आली होती.

St Worker Protest : एवढं धाडस येतं कुठून? आंदोलनामागचा मास्टरमाईंड शोधू, अजित पवारांचा इशारा कुणाला?

Jitendra Avhad : महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली; सिल्वर ओकवरील हल्ल्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

Gunratna Sadavarte : माझी हत्या होऊ शकते, गावदेवी पोलीस ठाण्यातून गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप

भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.