Marathi News Maharashtra Mumbai Gunratna sadavarte arrested by mumbai police after st employee agitators protested on sharad pawar silver oak residence at afternoon in mumbai know which ipc has putted on gunratna sadavarte
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांकडून अटक, सरकारी कामात अडथळा, कटात सामील असल्याचा आरोप
गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. सरकारी कामात अडथळा आणला आणि कटात सामील असल्याचा ठपका ठेवत ही अटक झाली आहे. शरद पवारांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी जे आक्रमक आंदोलन केले. त्याच प्रकरणी गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक
Image Credit source: tv9
Follow us on
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना (Adv. Gunratna Sadavarte) पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. सरकारी कामात अडथळा आणला आणि कटात सामील असल्याचा ठपका ठेवत ही अटक झाली आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) जे आक्रमक आंदोलन केले. त्याच प्रकरणी गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या आहेत. शुक्रवारी दुपारी जे आक्रमक आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर राज्याच्या राजकारणातला पारा चांगलाच चढला होता. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. तसेच या प्रकरणावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत होत्या. गुणरत्न सादवर्ते यांनी गुरूवारी कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आझाद मैदानात जे भाष्य केलं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना भडकल्याचा आरोप होतं आहे. आझाद मैदानातून त्यांनी बारामतीत येऊन आंदोलन करू आम्हाला थांबवून दाखवा असा थेट इशारा शरद पवारांना दिला होता.
सदावर्तेंना पोलिसांनी का ताब्यात घेतलं ?
मुंबईत पवारांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांचा हल्ला
सिल्व्हर ओकवर चप्पल फेकत संपकऱ्याचं आंदोलन
सदावर्तेंच्या भाषणामुळे पवारांच्या घरी हल्ला, असा पोलिसांचा निष्कर्ष
कोण आहेत गुणरत्न सदावर्ते, 10 गोष्टींमधून समजून घ्या!
गुणरस्त सदावर्ते वकील आहे. त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात कायदेशीर लढा दिला होती. तेव्हापासून ते चर्चेत होते.
एस कर्मचाऱ्यांच्या आंदोलन गुणरत्न सदावर्ते यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडचे आहेत. त्यांचं शिक्षण औरंगाबाद आणि मुंबईत झालं आहे.
वेगवेगळ्या सामाजिक आंदोलनांमध्ये आणि चळवळींमध्ये सदावर्ते यांचा सहभाग असायचा.
सम्यक विद्यार्थी आंदोलन ही संघटना सदावर्ते यांनी सुरु केली होती. या संघटनेच्या माध्यमातून सदावर्ते यांनी विविध विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले होते.
सदावर्ते हे आता मुंबईत वकिली करतात. त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएचडी घेतलेली आहे.
सदावर्ते दोनवेळा मॅटच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत. तसंच ते बार काऊन्सिलच्या शिखर परिषदेवरही होते.
गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीचं नाव जयश्री पाटील आहे. त्यांना एक मुलगी असून तिचं नाव झेन आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिकाही केलेली होती.
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर 2018 साली हल्लाही करण्यात आलेला होता. मराठी आरक्षणाविरोधातील याचिकेच्या सुनावणीनंतर हा हल्ला करण्यात आला होता. तसंच त्यांना शिवीगाळही करण्यात आली होती.