Gunratna Sadavarte : शरद पवार, सुप्रिया सुळेंनी जमिनी बळकावल्या, त्या बाहेर काढल्या, त्याचाच वचपा सरकारने काढला, जयश्री पाटलांचा पवारांवर थेट आरोप

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (St Worker Protest) भडकवल्याप्रकरणी कोर्टाने वकील गुणरत्न सादवर्ते (Gunratna Sadavarte) यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. मात्र त्यानंतर सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील (Jayshree Patil) यांनी पुन्हा पवार कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

Gunratna Sadavarte : शरद पवार, सुप्रिया सुळेंनी जमिनी बळकावल्या, त्या बाहेर काढल्या, त्याचाच वचपा सरकारने काढला, जयश्री पाटलांचा पवारांवर थेट आरोप
जयश्री पाटलांचा पुन्हा गंभीर आरोपImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 6:10 PM

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (St Worker Protest) भडकवल्याप्रकरणी कोर्टाने वकील गुणरत्न सादवर्ते (Gunratna Sadavarte) यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. मात्र त्यानंतर सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील (Jayshree Patil) यांनी पुन्हा पवार कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. हे भ्रष्टाचाराचे कॅन्सर आहेत, शरद पवार, अजित पवार यांची 600 कोटींची केस बाहेर काढली, त्याचा बदला घेण्यासाठी ही अटक करण्यात आली. कायद्याचा मिसयूज करताहेत शरद पवार, दिलीप वळसे पाटील. काही झालं तरी आम्ही लढणार, ज्याप्रकारे तुम्ही माझ्या पतीला अटक केली, ती चुकीची आहे. फक्त आणि फक्त टार्गेट करण्यासाठी केलं, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील यांच्यापासून जिवाला धोका आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंची ज्या जमिनी बळकावल्या आहे, त्याच्यामुळेच ही केस दाखल करण्यात आली, असा थेट आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे कालच कशा बाहेर आल्या?

तसेच पवार कुटुंबियांवर आणि सरकारवर निशाणा साधताना जयश्री पाटील म्हणाल्या, बघा या कष्टकऱ्यांच्या भावना, हे माझे कष्टकरी आहेत, जे आझाद मैदाना 5 महिन्यापासून होते, हजारोंच्या संख्येने जमले होते, त्यावेळी कोणताही प्रकार घडला नाही, जेव्हा हे कष्टकरी पूर्णत:केस जिंकले, त्यानंतर सदावर्तेंनी सांगितलं, की तुम्ही जॉयनिंगची डेट आम्ही सांगू, काय सुप्रिया सुळे म्हणत होत्या मी चर्चा करते. कालच कशा त्या बाहेर आल्या. गेल्या 5 महिने त्या चर्चा का करत नव्हत्या, याच्यामागे काहीतरी कटकारस्थान आहे, असेही जयश्री पाटील म्हणाल्या आहेत. कष्टकऱ्यांनो, हे पाहा भगवान बुद्ध, महावीराची आठवण करा, आणि शांतेतेच्या मार्गाने चाला, जय श्रीराम, जय शिवाजी महाराज म्हणत त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहनही केले. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होऊद्या अशी हाक सदावर्तेंनी पोलिसांच्या ताब्यातून दिली आहे.

वळसे-पाटलांनी आरोप फेटाळले

जयश्री पाटील यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही त्यांना अशी सवय आहे, ते आरोप आम्ही फेटाळून लावतो,  अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिली आहे.  एसटी कर्मचाऱ्यांनी शांततेने सहकार्य करावे . त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तसेच हा न्यायालयाचा हा निर्णय आहे सविस्तर निकाल आल्यावर बोलता येईल. उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे. त्याप्रमाणे राज्यसरकारने भूमिका घेतली. आता सगळ्यांनी सहकार्य करावे. असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Gunratan Sadavarte : प्रत्यक्ष आंदोलन करणाऱ्या 109 जणांना न्यायलयीन कोठडी, सदावर्तेंना मात्र पोलीस कोठडी मिळाली कारण…

Pune Neelam Gorhe : ‘कोर्टाचा आदेशही धुडकावणाऱ्या आंदोलकांचा हेतू पवार कुटुंबीयांना इजा करण्याचा असावा’

St Worker Protest : अशा प्रकारची घटना कधीही योग्य नाहीच, पवारांच्या घारबाहेरील आंदोलनावर राज्यपालांची पहिली प्रतिक्रिया

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.