Gunratna Sadavarte : एसटी कर्मचारी गुणरत्न सदावर्तेंच्या भेटीला, तर दुसरीकडे जामीन रद्द करण्याच्या मागणीने जोर धरला
आता सदावर्तेंचा जामीन पुन्हा रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी ही मागणी उचलून धरली आहे. तसेच नागपूर खंडपीठात सदावर्तेंचा जामीन रद्द करावा यासाठी याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
मुंबई : गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) जवळपास 18 दिवसांच्या कोठडी मुक्कामानंतर (Police Custody) बाहेर आले आहेत. त्यानंतर ST कामगार (St Worker) सदावर्तेंच्या भेटीला आज पोहोचले आहेत. सदावर्तेंना मंगळवारी जामीन मंजूर झाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन भडकावल्याप्रकरणी तसेत अनेक इतर गुन्ह्यात गुणरत्न सदावर्ते बरेच दिवस कोठडीत राहिले आहेत. तर सदावर्तेंचा पेढा भरवून एसटी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे. गुणरत्न सदावर्तेंच्या भाषणांमुळे एसटी आंदोलन भडकले, तसेच सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळले आणि त्यातून मालमत्ता खरेदी केल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले, असे विविध आरोप होत आहेत. अशातच आता सदावर्तेंचा जामीन पुन्हा रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी ही मागणी उचलून धरली आहे. तसेच नागपूर खंडपीठात सदावर्तेंचा जामीन रद्द करावा यासाठी याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
मनिषा कायंदेंची जामीन रद्द करण्याची मागणी
गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात आता शिवसेना नेत्या मनिषा कायंदे पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना फसवणारे, त्यांच्याकडं करोडो रुपये उकळणारे, त्यांना देशोधडीला लावणारे गुणरत्न सदावर्ते यांना तुरुंगात डांबलं होतं, ते आता जामिनावर बाहेर आहेत आणि आता ते म्हणतात की महाराष्ट्र मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा. त्यांना जामीन देताना देताना कोर्टाने त्यांना सक्त ताकीद दिली होती की कोणत्याही प्रकारचे वेडेवाकडे भाष्य त्यांनी करू नये. खरं म्हणजे या विषयाशी त्यांचा काही संबंध नाही आणि अशा पद्धतीने त्यांनी कोर्टाचा अवमान केलेला आहे contempt of court केलेला आहे आणि मी अशी मागणी करते की गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा तुरुंगात डांबले पाहिजे, असे शिवसेना नेत्या मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.
नागपूर खंडपीठात जामीनाविरोधात याचिका
वकील गुणरत्न सदावर्ते यांना मिळालेला अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. याचिका स्वीकारून हाय कोर्टाने सदावर्ते व राज्य सरकारला नोटीस जारी केली. एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करून पैशाचा अपहार केल्याप्रकरणी अकोला जिल्ह्याच्या आकोट पोलिस स्टेशन मध्ये सदावर्ते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यात सदावर्ते यांना आकोट सत्र न्यायालयाने अटकपूर्व जमीन मंजूर केला होता. हा अटकपूर्व जमीन रद्द करण्यात यावा यासाठी अकोला येथील विजय मालोकर यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा सदावर्ते यांच्याविरोधात जोरदार रान उठताना दिसून येत आहे.