देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा ‘कट’; गुणवतं सदावर्ते यांनी बड्या अधिकाऱ्यांसह नेत्यांचीही नावं घेतली
देवेंद्र फडणवीस यांनी अटक करण्यासाठी आ्रणि नागपूर कनेक्शन स्पष्ट करण्यासाठई डीसीपी निलोटपाल यांना खुर्चीवर बसवण्यात आले. आणि सर्व कट महाविकास आघाडीतील नेत्यांनी रचला होता असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या काळात मला अटक करण्याचा प्रयत्न होता असा आरोप मविआवर करण्यात आला होता. आता त्यावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस अधिकारी संजय पांडे, विश्वास नांगरे-पाटील आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काल बोलताना असा कोणताही कट नव्हता असं माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
त्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी सांगिलते की, दिलीप वळसे-पाटील यांनी बोलताना बरोबर शब्द वापरला आहे. तो म्हणजे कट.
महाविकास आघाडीचे सरकार असताना शरद पवार यांच्या सुचनेनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा कट रचला जात होता हे खरेच असल्याचेही गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.
सदावर्ते यांनी सांगितले की, मला ज्या दिवशी महामंडळातील कष्टकऱ्यां कामगारांच्या आंदोलनामुळे शरद पवारांच्या घरावर हल्ला झाल्याप्रकरणी मला अटक करण्यात आली होती. त्यानंतर महाविकास आघाडीने एक शृंखला आखली होती. त्यामध्ये विश्वास नांगरे पाटील यांना सर्व माहिती होती.
देवेंद्र फडणवीस यांनी अटक करण्यासाठी आ्रणि नागपूर कनेक्शन स्पष्ट करण्यासाठई डीसीपी निलोटपाल यांना खुर्चीवर बसवण्यात आले. आणि सर्व कट महाविकास आघाडीतील नेत्यांनी रचला होता असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
शरद पवार यांच्या घरावर हल्ल झाल्यानंतर दोन गोष्टीभोवती तपास फिरवला जात होता. एक म्हणजे नागपूर आणि दुसरं म्हणजे आरएसएस. मात्र त्यानंतर रात्री अपरात्री माझ्याकडे या हल्लाबाबत चौकशी केली जात होती.
त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन आपल्याला त्यांचा काय समावेश होता काय अशी चौकशीही केली जात होती. त्यामुळे या कटापायी विश्वास नांगरे-पाटील, अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी गुणवंत सदावर्ते यांनी केली आहे.