Eknath Shinde: कुणी हस्तांदोलन करतंय, कुणी टी शर्टवर, गुवाहाटीतल्या शिवसेना बंडखोर आमदारांचा लाख शब्दांचा एक एक फोटो पहा
व्हिडीओमध्ये सुनील प्रभू यांचे नाव घेतले नाही मात्र प्रताप सरनाईक मागच्या प्रतोदासारखं नका करू असं ते आमदार गोगावले यांना सांगत आहेत. यावेळी ते मुंबईतील लोकांना जास्त बोलायलाही द्या असंही ते त्या व्हिडीओमध्ये सांगताना दिसून येत आहेत
मुंबईः राज्यातील राजकारण विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Result) ढवळून निघाले त्याला कारण होतं एकनाथ शिंदे यांची बंडखोरी. शिवसेनेचे आमदार, मंत्री आणि गटनेते पदी असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन बंडखोरी पुकारली. विधान परिषदेच्या निकाल जाहीर होताच शिवसेनेच्या आमदाराना घेऊन त्यांनी थेट सूरत गाटले. हे प्रकरण सूरतमध्येच थांबेल असं वाटत असतानाच त्याच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांचे हे नाराजी नाट्य सूरतमधून मध्यरात्री या नाराजीनाट्य गुवाहाटीमध्ये (Guwahati)जाऊन थांबले.
शिवसेनेची जबाबदारी घेणारे बंडखोर आमदार…@mieknathshinde @PratapSarnaik @RealBacchuKadu pic.twitter.com/AnvN6N1hKk
— Mahadev Parvti Ramchandra (@mahadevpr) June 22, 2022
एकनाथ शिंदे यांनी ज्या 35 आमदारांना घेऊन ते गुवाहाटी येथे गेले त्यानंतरही हे नाट्य न थांबता सुरुच राहिले. त्याला जोड मिळाली ती शिवसेनेच कट्टर सैनिक समजले जाणारे गुलाबराव पाटील हेही एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार ज्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबले होते, त्याच हॉटेलमध्ये शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्यासह आणखी तीन आमदारांचाही समावेश झाला आहे.
आमदारांचा डामडौल
ज्या रेडिसन हॉटेलमध्ये बंडखोर आमदार थांबले आहेत, तेथील आमदारांचा डामडौलही आता हॉटेलमधील फोटोमुळे सर्वांसमोर आला आहे. तेथील व्हिडीओ आण आमदारांचे होणारे बोलणे प्रचंड व्हायरल झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले बंडखोर आमदार हॉटेलमधील हॉलमध्ये बसून ते काय बोलत आहेत, पुढील राजकीय खेळी काय असणार आहे त्यासंदर्भातील बोलणंही त्या व्हिडीओमध्ये व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात आणखी खळबळ उडाली आहे.
गळाभेटी आणि संवाद
हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये गुलाबराव पाटील यांचे आगमन झाल्यानंतर उपस्थित आमदारांची घेतलेल्या गाठीभेटी, गळाभेटीही यातून दिसून येत आहे. या हॉटेलमधील एकनाथ शिंदे, प्रतापसरनाई, बच्चू कडू बसलेला असतानाचा आणि प्रतोदविषयी चाललेल्या संवादाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. त्यामध्ये प्रतापनाईक प्रताप सरनाईक प्रतोदाच्या कामाविषयी बोलताना दिसत आहे तर त्यामध्ये आमदार भरत गोगावलेंना ते प्रतोदची जबाबदारी सांगत आहेत. आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीवही करून देत असल्याचे त्यातून दिसत आहेत.
मागच्या प्रतोदासारखं नका करू
या व्हिडीओमध्ये सुनील प्रभू यांचे नाव घेतले नाही मात्र प्रताप सरनाईक मागच्या प्रतोदासारखं नका करू असं ते आमदार गोगावले यांना सांगत आहेत. यावेळी ते मुंबईतील लोकांना जास्त बोलायलाही द्या असंही ते त्या व्हिडीओमध्ये सांगताना दिसून येत आहेत.
एकनाथ शिंदेंचा घेतला आशिर्वाद
ज्याप्रमाणे प्रतोदविषयी बोललं जात आहे, त्याचप्रमाणे गुलाबराव पाटील आल्यानंतर त्यांनी बंडखोर आमदारांची घेतलेली गळाभेट आणि त्यानंतर हॉटेलमध्ये आता बोलत थांबलेल्या एकनाथ शिंदे यांच्या जाऊन त्यांनी पायाला स्पर्शही केला आहे. हॉटेलमधील हे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात आणखी खळबळ उडाली आहे.