Hanuman Chalisa: हिम्मत असेल तर बांद्राला येऊन दाखवा; शिवसैनिकांचे राणा दांपत्याला आव्हान
मुंबईः काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मुख्यमंत्र्यांचा वांद्रे निवासस्थानी मातोश्री (Matoshri) बाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले आहे. आपल्या भूमिकेवर ते ठाम असून रवी राणा दांपत्य सध्या मुंबईत दाखल झाल्याची माहिती त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ही […]
मुंबईः काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मुख्यमंत्र्यांचा वांद्रे निवासस्थानी मातोश्री (Matoshri) बाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले आहे. आपल्या भूमिकेवर ते ठाम असून रवी राणा दांपत्य सध्या मुंबईत दाखल झाल्याची माहिती त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. रवी राणा यांच्या आव्हानानंतर मातोश्री बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मध्यरात्रीपासून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिवसैनिकांनी पोस्टरबाजी करुन हिम्मत असेल तर बांद्राला येऊन दाखवण्याचे आव्हान राणा दांपत्याला करण्यात आले आहे.
राणा दांपत्यामुळे मुंबईतील वातावरण आता आणखी गरम झाले आहे. कालानगर सिग्नलजवळ हिम्मत दाखवण्याचे पोस्टर लावल्यामुळे मुंबईसह आता राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. शिवसेनेकडून अशी पोस्टरबाजी केली गेली असली तरी राणा दांपत्य आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे शिवसैनिकांनीही आता त्यांना आव्हान दिले आहे.
राणा दांपत्य ठाम
मातोश्री च्या समोरच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने मोठा संख्या मध्ये बैरिकेटिंग लावण्यात आला आहे. आमदार रवी राणा आज अमरावती मधून निघणार आहे आणि उद्या मुख्यमंत्र्यांचा निवासस्थान मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मातोश्री बाहेर रस्त्याचं दोन्ही बाजू बरिकेटिंग वाढली आहे.
पोस्टरबाजी हिम्मत असेल तर…
मातोश्रीवर शिवसैनिक यांनी लावला पोस्टर हिम्मत असेल तर बांद्रा पूर्व येऊन दाखवा शिवसैनिक सज्ज आहे संदिप शिवलकर अशा प्रकारचे होल्डिंग काला नगर सिग्नल जवळ लावण्यात आली आहे.
पोलिसांचे आव्हान
काही दिवसापूर्वी खासदार नवनीत कौर राणा यांनी मातोश्रीवर 23 तारखेला आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मातोश्रीबाहेर मुंबई पोलिसांकडून मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. राणा दांपत्यामुळे मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
Real Estate: मुंबई शहर आणि उपनगरात बिल्डरांविरोधात सर्वाधिक तक्रारी! खालोखाल ठाणे, पुणेही