Mumbai : CSMT च्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर हार्बर रेल्वेचा डबा रुळावरून घसरला, वाहतूक ठप्प
ऐन सकाळच्या प्रहरीच ही घटना घडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. पनवेलकडे मार्गस्थ होणाऱ्या लोकलबाबत हा प्रकार घडला आहे. त्यामुळे काही या मार्गावरील रेल्वे वाहतूक ही काळापर्यंत का होईना ठप्प राहणार आहे.
मुंबई : (CSMT) छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर (Harbal Railway Station) हार्बर रेल्वेचा डबा रुळावरुन घसरला आहे. त्यामुळे वाहतूक ही विस्कळीत झाली होती. घटनेनंतर लागलीच (Railway Administration) रेल्वे प्रशासनाने या रेल्वेरुळावरील वाहतूक बंद ठेवली आहे. ऐन सकाळच्या प्रहरीच ही घटना घडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. वाशीकडे मार्गस्थ होणाऱ्या (Local Railway) लोकलबाबत हा प्रकार घडला आहे. लोकल मार्गस्थ होण्याऐवजी पाठीमागे येत होती. त्यादरम्यान ही घटना घडली आहे. सुदैवाने यामध्येही कोणीही जखमी नाही. रुळावरुन रेल्वे घसरली आणी प्लॅटफॉर्मचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे मार्गावरील रेल्वे वाहतूक ही काळापर्यंत का होईना ठप्प राहणार आहे.
हर्बल मार्गावरील वाहतूक विस्कळीत
रेल्वेच्या रुळावरुन डबाच घसरल्याने या मार्गावरील वाहतूक आता बंद ठेवण्यात आली आहे. ऐन वर्दळीच्या वेळीच ही घटना घडली आहे. सकाळी 10 च्या दरम्यान चाकरमान्यांची ये-जा करण्याची ही वेळ असते. शिवाय कार्यालयीन कामकाजासाठी अनेकजण लोकलचाच आधार घेतात. असे असताना रेल्वेचा डबाच घसरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर आता लोकलच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.
प्लॅटफॉर्म दोनवरुन वाहतूक
हर्बलकडून पनवेलकडे लोकल मार्गस्थ होत असताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे काही काळ प्रवाशांची गैरसोय झाली असली तरी लागलीच पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वे ह्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरुन सोडण्यास सुरवात झाली आहे. गैरसोय टाळता यावी म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अचानक ही घटना घडली असली तरी लोकलचा वेग मर्यादित असल्याने यामध्ये कोणी जखमी झाले नाही.
तीन तासानंतर वाहतूक पूर्वपदावर
हार्बर रेल्वेचा डबा रुळावरुन घसरला असल्याने आता या मार्गावरील वाहतूक ही बंद आहे. शिवाय आता दुरुस्तीच्या कामासाठी तीन तासाचा कालावधी लागणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे पनवेलकडे मार्गस्थ होण्यासाठी प्रवाशांना आता प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर जावे लागणार आहे.