हसन मुश्रीफ तातडीने मुंबईकडे रवाना, गृहमंत्रीपदाचा चार्ज जवळपास निश्चित!

राष्ट्रवादीचा मुस्लिम चेहरा आणि शरद पवारांचे खंदे समर्थक एवढीच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ओळख नाही, | Hasan Mushrif new home minister

हसन मुश्रीफ तातडीने मुंबईकडे रवाना, गृहमंत्रीपदाचा चार्ज जवळपास निश्चित!
हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 3:16 PM

मुंबई: अनिल देशमुख गृहमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर हे पद हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांच्याकडे सोपवले जाणार असल्याचा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार केला आहे. एकीकडे गृहमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीतील बड्या नावांची चर्चा असताना या शर्यतीत अचानक हसन मुश्रीफ यांची एन्ट्री झाली आहे. उच्च न्यायालायने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील आरोपाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर हसन मुश्रीफ तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते. त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवारांचा दावा कितपत खरा ठरणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Hasan Mushirf may take charge of new home minister of Maharashtra)

कोण आहेत हसन मुश्रीफ?

राष्ट्रवादीचा मुस्लिम चेहरा आणि शरद पवारांचे खंदे समर्थक एवढीच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ओळख नाही, तर कोल्हापूर आणि कागलच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. सलग पाचव्यांदा निवडून येऊन ते कागलकरांच्या मनातील हिंदकेसरीही ठरले आहेत.

हसन मुश्रीफ यांचा जन्म 1954मध्ये झाला. त्यांनी अर्थशास्त्रातून बीएची पदवी घेतली आहे. हिंदी, मराठी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्त्व आहे. त्यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. विद्यार्थीदशेपासूनच ते चळवळीत सक्रिय होते. दलित, मुस्लिम, शोषितांच्या विकासासाठी त्यांनी नेहमी आंदोलने केली. कर्नाटक सीमाप्रश्नावर शरद पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात त्यांनी भआग घेतला होता. अनेक शैक्षणिक संस्था आणि सहकारी बँकांवर ते चेअरमन म्हणून सक्रिय आहेत. सहकार क्षेत्रातही ते कार्यरत आहेत.

पाचव्यांदा कागल राखले

मुश्रीफ हे कोल्हापूरमधील कागल विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून आले आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे यांचा पराभव केला. 28 हजार मतांनी त्यांनी समरजितसिंह यांना पराभूत केले. तर शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. विशेष म्हणजे माझी ही शेवटची निवडणूक आहे, असं भावनिक आवाहन संजय घाटेग यांनी केले होते. मात्र त्यांना केवळ 55 हजार 657 मते मिळाली. त्यांचा सलग पाचव्यांदा पराभव झाला. तर मुश्रीफ यांनी सलग पाचवेळा मैदान मारून कागलकरांच्या मनातला आपणच हिंदकेसरी असल्याचं दाखवून दिलं आहे.

अखेर अनिल देशमुख यांचा राजीनामा

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देणार आहेत. सीबीआयची चौकशी चालू असताना पदावर राहणं योग्य नसल्याचं सांगून देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. संबंधित बातम्या:

अखेर अनिल देशमुख यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना

आधी आबांकडून चार्ज, आता अनिल देशमुखांकडून पदभार? जयंत पाटलांचं नाव गृहमंत्रीपदाच्या रेसमध्ये!

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.