HDFC चे होम लोन स्वस्त, जुन्या ग्राहकांनाही फायदा

HDFC कंपनीचे होम लोन आता स्वस्त झाले आहे. त्याचा फायदा जुन्या ग्राहकांना देखील होणार आहे. कंपनीचे नवे व्याजदर 6 जानेवारीपासून लागू होणार आहेत.

HDFC चे होम लोन स्वस्त, जुन्या ग्राहकांनाही फायदा
तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढेच कर्ज फेडले तरी हरकत नाही. कर्जाची मूळ रक्कम कमी झाल्यास साहजिकच तुमचे व्याजही कमी होईल. त्यामुळे तुम्हाला कमी रकमेचा हप्ता भरावा लागेल. लोन फोरक्लोझरसाठी केवायएसी आणि इतर कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील. लोन फोरक्लोजर करताना तुमच्या मालमत्तेची कागदपत्र बँकेकडून घ्यायया विसरु नका.
Follow us
| Updated on: Jan 04, 2020 | 2:32 PM

मुंबई : आपल्या हक्काचे आणि स्वत:चे एक घर असावे, असे प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही व्यक्ती होम लोनची (HDFC decrease interest rate of home loan) मदत घेतात. तुम्ही देखील होम लोनचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. HDFC लिमिटेड या हाऊसिंग लोन कंपनीने याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या कंपनीने व्याज दरात 0.05 टक्क्यांनी घट केली आहे. विशेष म्हणजे याचा फायदा जुन्या ग्राहकांना (HDFC decrease interest rate of home loan) देखील होणार आहे.

HDFC कंपनीने हाऊसिंग लोनवर रिटेल प्राईम लँडिंग रेट (RPLR) कमी केले आहेत. त्यानंतर अॅडजस्टेबल रेट होम लोन (ARHL) 0.05 टक्क्यांनी कमी झाले आहेत. हे नवीन व्याजदर 6 जानेवारी 2020 पासून लागू होणार आहेत. HDFC कंपनीचा होम लोनचा व्याजदर हा रिटेल प्राईम लँडिंग रेटच्या आधारावर निश्चित केला जातो.

HDFC कंपनीच्या अगोदर स्टेट बँकेने होम आणि ऑटो लोनचे दर कमी केले होते. नवीन घर खरेदी करणाऱ्याला आता स्टेट बँके 7.90 टक्के व्याजदर देते. याअगोदरचे व्याजदर हे 8.15 टक्के इतके होते. मात्र, बँकेने एक्सटर्नल बेंचमार्क रेटला (EBR) 8.05 टक्क्यांवरुन 7.80 टक्क्यांपर्यंत कमी केले.

देशावर सध्या आर्थिक मंदीचे सावट आहे. भारताचा विकास दर 5 टक्क्यांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे देशातील अर्थतज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. याच घडमोडींच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडे अनेकांच्या अपेक्षा आहेत. रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट कमी झाला तर होम लोनचा व्याजदर कमी होऊ शकतो. त्यामुळे अनेकांना रिझर्व्ह बँकेकडे अपेक्षा आहेत. मात्र, गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केला नाही. त्यामुळे अनेकांच्या पदरात निराशा पडली. रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट कमी झाला तर त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम सर्वसामान्यांच्या होम लोनवर पडतो.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.