Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य, काळजी घ्या- आरोग्यमंत्री

UKमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणूचा नवा अवतार हा अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे आपल्यालाही आता जास्त काळजी घ्यावी लागेल, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय.

कोरोनाचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य, काळजी घ्या- आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 3:13 PM

मुंबई: युनायटेड किंगडम अर्थात UKमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणूचा नवा अवतार हा अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे आपल्यालाही आता जास्त काळजी घ्यावी लागेल, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. कोरोना विषाणूचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य असला तरी आपण सध्या देत असलेली औषधं आणि निर्माण होत असलेल्या कोरोना लस या त्या विषाणूवर परिणामकारक असल्याचा दावाही आरोग्यमंत्री टोपे यांनी केलाय. (Health Minister Rajesh Tope appeals to citizens)

या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपण ब्रिटन, मिडल ईस्ट, युरोपीय देशातून येणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण बंधनकारक केलं आहे. कोरोनाबाबत सरकारने घालून दिलेले नियम पाळणं अधिक गजरेचं आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि नाताळ, तसंच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं लावलेल्या रात्रीच्या संचारबंदीला चांगला प्रतिसाद असल्याचंही टोपे म्हणाले.

कोरोना विषाणूच्या नव्या अवताराबाबत पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमद्ये योग्य ते संशोधन करण्याचं काम सुरु आहे. याचा योग्य अभ्यास करुन ते आपला अहवान ICMR ला सादर करणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

लसीकरण प्रशिक्षण पूर्ण

केंद्र सरकारने दिलेल्या कार्यक्रमानुसार राज्य सरकारकडून लसीकरणाचं प्रशिक्षण पूर्ण झालं असल्याचंही आरोग्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर शीतगृहांच्या कमतरतेबाबत केंद्राला कळवण्यात आलं असून, केंद्राकडून त्याबाबत आश्वासन देण्यात आलं आहे. आपल्याला नागरिकांना दोन वेळा लस द्यावी लागणार आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत राज्य सरकारने मायक्रो प्लॅनिंग केल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगितलं.

सीरम, भारत बायोटेकची लस अंतिम टप्प्यात

सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठानं संयुक्त विद्यमान तयार केलेली लसीचं तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल पूर्ण झालं आहे. सीरमकडून लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मागण्यात आली आहे. त्याचबरोबर भारत बायोटेककडूनही केंद्र सरकारकडे परवानगी मागवली आहे. त्यामुळे आता चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात आहे. त्यांनी ठरवायचं आहे की कोणत्या तारखेला लसीकरणाला सुरुवात करायची, असंही राजेश टोपे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

2021 पर्यंत मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग गरजेचं!

नव्या कोरोना विषाणूवरची लस आली तरी सर्वांना संपूर्ण 2021 पर्यंत मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं सुरूच ठेवावं लागणार असल्याचं राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी स्पष्ट केलं. कोरोनाच्या नव्या विषाणूचा प्रारंभ हा लंडनमध्ये झालेला आहे. इंग्लंडमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या केसेस आपल्याला ऐकायला मिळत आहेत. म्हणजे संख्यात्मक विचार केला तर एका दिवसांमध्ये जवळजवळ 32 हजार नवे रुग्ण आढळून येत असून ही लक्षणीय बाब होती. कोरोनाचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरण्याचा जो संभव आहे, त्याची या उपप्रकारामध्ये 70% ॲक्टिव्हिटी अधिक आहे. त्यामुळे अधिक चिंता वाढली असून त्यासाठीच सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज आहे, असं डॉ. ओक यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

कोरोनाच्या संकटात आणखी एक धोका, अमेरिकेत ‘मेंदू खाणाऱ्या अमिबा’ची दहशत!

ब्रिटनमध्ये नव्या कोरोना विषाणूचा कहर; मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात संशोधन सुरू

Health Minister Rajesh Tope appeals to citizens

कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.