Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajesh Tope Mother Died | कोरोना वॉरियर पोरका झाला! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे (74) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार (Rajesh Tope Mother Died) सुरु होते.

Rajesh Tope Mother Died | कोरोना वॉरियर पोरका झाला! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक
Follow us
| Updated on: Aug 01, 2020 | 11:50 PM

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे (74) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रदीर्घ आजाराने त्या त्रस्त होत्या. त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज (1 ऑगस्ट) उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Health Minister Rajesh Tope Mother Sharda Tope Died)

शारदा टोपे या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या (2 ऑगस्ट) संध्याकाळी 4 वाजता पार्थपूर ता. अंबड जि. जालना या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.  कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

ती अजातशत्रु होती : राजेश टोपे 

“ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. चार वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील,” अशी भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर आईच्या मृत्यूमुळे दुखाचा डोंगर कोसळला. टोपे यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले. कोरोना वॉरियर पोरका झाला, अशा शब्दात अनेकांनी राजेश टोपेंच्या आईला श्रद्धांजली वाहिली.

राजेश टोपे यांच्या आईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. मार्चमध्येही त्या महिनाभर ॲडमीट होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला रुग्णालयात जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरुवात ते करायचे.  (Health Minister Rajesh Tope Mother Sharda Tope Died)

अजित पवारांची प्रतिक्रिया 

“राज्याचे आरोग्यमंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळातील माझे सहकारी राजेश टोपे यांच्या आई शारदा अंकुशराव टोपे यांचे निधन हा आमच्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. मी आदरणीय शारदाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

“शारदाताईंनी ज्येष्ठ नेते तसेच माजी खासदार स्वर्गीय अंकुशराव टोपे यांना जीवनाच्या प्रत्येक पावलावर समर्थ साथ दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष सुपुत्र महाराष्ट्राला दिला. मी स्वर्गीय शारदाताईंच्या स्मृतींना वंदन करतो. कोरोनाच्या संकटकाळात संपूर्ण राज्याच्या आरोग्याची काळजी घेत असताना राजेश टोपे यांनी त्यांच्या मातोश्रींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांनी मातोश्रींचीही तितक्याच तन्मयतेने काळजी घेतली.”

“आज मी, राज्य मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि राज्यातील समस्त जनता राजेश टोपे कुटुंबियांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहोत. स्वर्गीय शारदाताई यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले

मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच राजेश टोपे आरोग्यमंत्री या नात्याने राज्याची काळजी घेत आहे. या जबाबदारीत त्यांनी काहीही कमी पडू दिलेले नाही. ही जबाबदारी खांद्यावर असतानाच राजेश टोपे यांना दुहेरी जबाबदारी सतावत होती. विविध व्याधी जडलेली जन्मदात्री गेल्या काही महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देत होती. बॉम्बे हॉस्पिटलच्या आईसीयूमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्रींवर उपचार सुरु होते.

मात्र कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या बैठका, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा, पत्रकार परिषद अशा व्यस्त वेळापत्रकामुळे राजेश टोपे यांना जराही उसंत मिळत नाही. कर्तव्यदक्ष राजेश टोपे यांना आईची विचारपूस करायला जाण्यासाठीही फारच कमी वेळ मिळतो. ‘दिव्य मराठी’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राजेश टोपे यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या होत्या. (Health Minister Rajesh Tope Mother Sharda Tope Died)

संबंधित बातम्या : 

स्वत:ची आई ICU मध्ये, मात्र लेकाची महाराष्ट्राला वाचवण्यासाठी धडपड, राजेश टोपेंना सलाम

आई दवाखान्यात, महाराष्ट्राचा लढवय्या लेक मैदानात, जयंत पाटलांकडून राजेश टोपेंचं आगळंवेगळं कौतुक

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.