मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे (74) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रदीर्घ आजाराने त्या त्रस्त होत्या. त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज (1 ऑगस्ट) उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Health Minister Rajesh Tope Mother Sharda Tope Died)
शारदा टोपे या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या (2 ऑगस्ट) संध्याकाळी 4 वाजता पार्थपूर ता. अंबड जि. जालना या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
“ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. चार वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील,” अशी भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.
राज्याचे आरोग्यमंत्री व राज्य मंत्रिमंडळातील माझे सहकारी @rajeshtope11 यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचं निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. आदरणीय शारदाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना!आम्ही टोपे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. pic.twitter.com/krCj1jTkxE
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 1, 2020
राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर आईच्या मृत्यूमुळे दुखाचा डोंगर कोसळला. टोपे यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले. कोरोना वॉरियर पोरका झाला, अशा शब्दात अनेकांनी राजेश टोपेंच्या आईला श्रद्धांजली वाहिली.
राजेश टोपे यांच्या आईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. मार्चमध्येही त्या महिनाभर ॲडमीट होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला रुग्णालयात जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरुवात ते करायचे. (Health Minister Rajesh Tope Mother Sharda Tope Died)
तू केवळ राजेश भय्यांची नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची आई होतीस. या जागतिक संकटाला धीरानं तोंड देणाऱ्या @rajeshtope11 ची तू शक्ती होती. राजेश भय्याला लढण्याची शक्ती द्यायला तू आणखी जगायला हवं होतं. शारदाबाई टोपे यांच्या पवित्र आत्मास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !! pic.twitter.com/gyPWWHcByk
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) August 1, 2020
माझे सहकारी @rajeshtope11 यांचे मातृ छत्र हरवले, जे राज्यातील जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी, कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत त्यांच्या वाट्याला आभाळाएवढे दुःख आले. हे दुःख वाटून घेण्यात मी टोपे परिवाराच्या सोबत आहे. शारदाताईना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/73udxUB3g4
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 1, 2020
“राज्याचे आरोग्यमंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळातील माझे सहकारी राजेश टोपे यांच्या आई शारदा अंकुशराव टोपे यांचे निधन हा आमच्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. मी आदरणीय शारदाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
“शारदाताईंनी ज्येष्ठ नेते तसेच माजी खासदार स्वर्गीय अंकुशराव टोपे यांना जीवनाच्या प्रत्येक पावलावर समर्थ साथ दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष सुपुत्र महाराष्ट्राला दिला. मी स्वर्गीय शारदाताईंच्या स्मृतींना वंदन करतो. कोरोनाच्या संकटकाळात संपूर्ण राज्याच्या आरोग्याची काळजी घेत असताना राजेश टोपे यांनी त्यांच्या मातोश्रींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांनी मातोश्रींचीही तितक्याच तन्मयतेने काळजी घेतली.”
“आज मी, राज्य मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि राज्यातील समस्त जनता राजेश टोपे कुटुंबियांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहोत. स्वर्गीय शारदाताई यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले
राज्याचे आरोग्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते @rajeshtope11 यांना मातृशोक झाल्याची वार्ता दुःखद आहे. टोपे कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. शारदाताई अंकुशराव टोपे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ?
— Sunil Tatkare (@SunilTatkare) August 1, 2020
मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच राजेश टोपे आरोग्यमंत्री या नात्याने राज्याची काळजी घेत आहे. या जबाबदारीत त्यांनी काहीही कमी पडू दिलेले नाही. ही जबाबदारी खांद्यावर असतानाच राजेश टोपे यांना दुहेरी जबाबदारी सतावत होती. विविध व्याधी जडलेली जन्मदात्री गेल्या काही महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देत होती. बॉम्बे हॉस्पिटलच्या आईसीयूमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्रींवर उपचार सुरु होते.
मात्र कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या बैठका, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा, पत्रकार परिषद अशा व्यस्त वेळापत्रकामुळे राजेश टोपे यांना जराही उसंत मिळत नाही. कर्तव्यदक्ष राजेश टोपे यांना आईची विचारपूस करायला जाण्यासाठीही फारच कमी वेळ मिळतो. ‘दिव्य मराठी’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राजेश टोपे यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या होत्या. (Health Minister Rajesh Tope Mother Sharda Tope Died)
संबंधित बातम्या :
स्वत:ची आई ICU मध्ये, मात्र लेकाची महाराष्ट्राला वाचवण्यासाठी धडपड, राजेश टोपेंना सलाम
आई दवाखान्यात, महाराष्ट्राचा लढवय्या लेक मैदानात, जयंत पाटलांकडून राजेश टोपेंचं आगळंवेगळं कौतुक