Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाच्या तुलनेत आपला ग्रोथ रेट कमी, महाराष्ट्र सेफ झोनमध्ये; आता दिवसाला 90 हजार टेस्टचे लक्ष्य : राजेश टोपे

आता आपण ज्यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर होण्याची शक्यता आहे, अशा लोकांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. | Rajesh Tope

देशाच्या तुलनेत आपला ग्रोथ रेट कमी, महाराष्ट्र सेफ झोनमध्ये; आता दिवसाला 90 हजार टेस्टचे लक्ष्य : राजेश टोपे
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 6:38 PM

मुंबई: संपूर्ण देशातील कोरोना परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र हा खूपच सेफ झोनमध्ये आहे, असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले. सध्या केरळ, गोवा आणि इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या तुलनेत महाराष्ट्रातील परिस्थिती समाधानकारक आहे. सध्या देशाचा कोरोना ग्रोथ रेट 0.4 टक्के आहे. तर राज्याचा कोरोना ग्रोथ रेट अवघा 0.2 टक्के इतका आहे. त्यामुळे आपण खूपच सेफ झोनमध्ये असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. (Rajesh Tope on Covid 19 situation in Maharshtra)

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंगळवारी राजेश टोपे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिवाळीच्या काळात कमी झालेली कोरोना चाचण्याची संख्या पुन्हा वाढवणार असल्याचे सांगितले. मध्यंतरी आपण दिवसाला आरटीपीसीआर आणि अँटीजेन अशा दोन्ही मिळून साधारण 90 हजार चाचण्या करत होतो. परंतु, दिवाळीच्या काळात चाचण्यांची संख्या 60 हजारापर्यंत खाली गेली होती. चाचण्यांची संख्या पुन्हा 80 हजाराच्या आसपास पोहोचली आहे. मात्र, ही संख्या आता 90 हजारापर्यंत नेली जाईल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

यामध्ये आता आपण ज्यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर होण्याची शक्यता आहे, अशा लोकांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. यामध्ये भाजी विक्रेते आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे. उद्यापासून या सर्वांच्या वेगाने चाचण्या सुरु होतील. यासंदर्भातील अधिसूचना तातडीने काढण्याचे आदेश आपण दिल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्येही हाच मुद्दा अधोरेखित करण्यात आल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.

‘लसीकरणाचा सर्व खर्च केंद्र सरकारच करणार’

सध्या भारतात दोन स्वदेशी आणि तीन खासगी लशींवर संशोधन सुरु आहे. भविष्यात या लशी उपलब्ध झाल्यास लसीकरणाचा सर्व खर्च केंद्र सरकार उचलेल. राज्याने लसीकरणाचा खर्च उचलावा, अशी कोणतीही चर्चा नाही. त्यासाठी लागणारी सर्व माहिती आपण केंद्र सरकारला पुरवत आहोत, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या:

कोरोना लशीच्या वितरणासाठी आतापासूनच तयारीला लागा; पंतप्रधान मोदींचे राज्यांना आदेश

अमित शाहांचा कोरोना नियंत्रणासाठी तीन कलमी कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांना कार्यवाहीच्या सूचना

कोरोनाची लस कधी येणार हे संशोधकांच्या हातात, राजकारण करू नका; मोदींचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

(Rajesh Tope on Covid 19 situation in Maharshtra)

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.