मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, समुद्रात भरतीचा इशारा; मिठी नदीही तुडुंब भरली

Mumbai Rain | सकाळी 9 वाजून 56 मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस सुरुच राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा जलमय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या 24 वॉर्डांमध्ये यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, समुद्रात भरतीचा इशारा; मिठी नदीही तुडुंब भरली
समुद्राला भरती येणार
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 8:25 AM

मुंबई: अनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने मुंबईत जोरदार पुनरागमन केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगराच्या परिसरात वेगवान वाऱ्यांसह पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमधील सततच्या पावसामुळे मिठी नदी सध्या तुडुंब भरून वाहत आहे. अशातच बुधवारी सकाळी 9 वाजून 56 मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस सुरुच राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा जलमय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या 24 वॉर्डांमध्ये यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तत्पूर्वी मंगळवारी मुंबईत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. रात्री 8.30 वाजेपर्यंत राम मंदिर येथे 78 मिमी असा 24 तासांचा सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. कुलाबा येथे कमाल तापमान 31 अंश तर किमान तापमान 25.5 मिमी नोंदवले गेले. तसेच सांताक्रूझ येथे कमाल तापमान 31.1आणि किमान तापमान 25.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील दोन दिवस रायगड, रत्नागिरी येथे तीव्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईतील तलावक्षेत्रातही मुसळधार पाऊस

डोक्यावर पाणीकपातीची टांगती तलवार असलेल्या मुंबईकरांनाही नुकत्याच झालेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांमध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा 1 लाख 28 हजार दशलक्ष लिटरने वाढला होता.

तलाव पाणीसाठा दशलक्ष लिटरमध्ये

मोडकसागर – 66,092 तानसा- 78,467 मध्य वैतरणा- 37,551 भातसा- 1,97,321 तुळशी- 8,046 विहार- 27,698

संबंधित बातम्या:

Mumbai rains: मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून 6 हजार कोटी खर्च, तरीही मुंबई पाण्यात; वाचा सविस्तर

चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य, ठाणे-नाशिक मार्गावर सहा किलोमीटरच्या रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

मुंबईत पालिकेच्या नाकर्तेपणामुळे वाहतूक पोलिसांवर रस्त्यावरील खड्डे भरण्याची वेळ

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.