Weather Alert: हवामान खात्याकडून मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain | 24 आणि 25 जुलै रोजी मुंबईत यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. आज मुंबईत जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबई: हवामान खात्याकडून मुंबईत शुक्रवारी जोरदार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. कालपासून मुंबईत पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. पावसाच्या मुसळधार सरी बरसत असल्या तरी त्या थोड्याथोड्या अंतराने कोसळत आहेत. मात्र, शुक्रवारी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो.
तसेच 24 आणि 25 जुलै रोजी मुंबईत यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. आज मुंबईत जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुणे, सांगली, कोल्हापूर आणि कोकणातील पावसाचा जोरही काहीसा ओसरला आहे. मात्र, गुरुवारी निर्माण झालेल्या पूरपरिस्थतीमुळे येथील अडचणी कायम आहेत. चिपळूणमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्यांसाठी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
Nowcast Warning issued at 0100Hrs IST dated 23-7-2021:
Intense to very intense spells of rain very likely to occur at isolated places in the districts of #Sindhudurg and #Kolhapur during next 3 hours.
-IMD MUMBAI
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 22, 2021
रेल्वेचा खोळंबा झाल्याने लालपरी प्रवाशांच्या मदतीला
जोरदार पावसामुळे रेल्वेचा खोळंबा झाल्याने आता लालपरी प्रवाशांच्या मदतीला धावून आली आहे. पुण्यातून मुंबईसाठी 60 ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल पुणे, पिंपरी चिंचवड आणि स्वारगेट डेपोतून मुंबईसाठी 60 ज्यादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. तर पुण्यातून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या सगळ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग
खडकवासला धरणातून गुरुवारी रात्री पाण्याच्या विसर्गाचा वेग वाढवल्याने डेक्कन येथील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला होता. रात्री 25 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात होते. मोठ्याप्रमाणात पाणी सोडल्याने शिवणे पूल आणि बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. आज सकाळपासून पाण्याचा वेग पुन्हा कमी करण्यात आला. सध्या खडकवासला धरणातून 9339 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. खडकवासला धरणक्षेत्रात अजूनही मुसळधार पाऊस सुरु आहे.
संबंधित बातम्या:
VIDEO | कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, नदीकाठच्या गावातील रहिवाशांचे स्थलांतर
Maharashtra Rain Live | कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना धोका
Big Breaking | महाडमध्ये दरड कोसळली, 30 घरे मातीखाली दबल्याने 72 नागरिक बेपत्ता असल्याचा अंदाज
(Heavy Rain expected in Mumbai)