मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, नालासोपारा, वसई-विरारमधील रस्त्यांवर पाणीच पाणी

| Updated on: Sep 15, 2019 | 9:27 AM

मुंबई शहरासह उपनगरात रात्रीपासून पावसाने जोर (Mumbai Rain) धरला आहे. नालासोपारा, वसई-विरार, मिरा-भाईंदर, कांदिवली, लोखंडवाला, पालघर, कल्याण-डोंबिवली परिसरात मुसळधार पऊस सुरु आहे (Nalasopara Rain). रात्रभर झालेल्या पावसामुळे आता ठीकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, नालासोपारा, वसई-विरारमधील रस्त्यांवर पाणीच पाणी
Follow us on

मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात रात्रीपासून पावसाने जोर (Mumbai Rain) धरला आहे. नालासोपारा, वसई-विरार, मिरा-भाईंदर, कांदिवली, लोखंडवाला, पालघर, कल्याण-डोंबिवली परिसरात मुसळधार पऊस सुरु आहे (Nalasopara Rain). रात्रभर झालेल्या पावसामुळे आता ठीकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे(Water logging). पाणी साचल्याने नागरिकांनी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जर हा पाऊस असाच सुरु राहिला, तर रेल्वे वाहतुकीवरही याचा परिणाम होऊ शकतो.

मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नालासोपारा पूर्व येथील तुळींज पोलीस स्टेशन समोरील सर्वच रस्ते जलमय झाले आहेत. तुळींज रोड, आचोले रोड, सेन्ट्रलपार्क रोड, संतोष भूवन रोड हा पाण्याखाली गेला आहे. तसेच, नालासोपारा पूर्व सेन्ट्रलपार्क, ओसवाल नगरी परिसरही पाण्याखाली गेला आहे.

वसई-विरारमध्येही मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. सतत सुरु असलेल्या पावसाने सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. विरार पश्चिम येथील विवा कॉलेज रोड, विरार पूर्व येथील मनवेलपाडा तलाव या परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.

पालघरमध्येही मध्यरात्री पासूनच पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. पालघर-बोईसर रोड, पालघर-माहिम रोड, पालघर-मनोर रोड, पालघर-माहिम हायवे रोडवरही पाणी साचलं आहे. तसेच, गोठणपूरच्या नगरपरिषद आरोग्य कर्मचाऱ्यांची चाळ येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

पाहा व्हिडीओ :