Mumbai: पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो आणि ऑंरेज अलर्ट
20-21 जूनला काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई : पुढील आठवड्यापासून पावसाचा (Rain) जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं राज्यात पुढील आठवड्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. हवामान विभागा कडून पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. भारतीय हवामान विभागा ने मुंबई, (Mumbai)ठाणे (Thane) आणि पालघरसाठी (Palghar) पाच दिवसांच्या अंदाजानुसार रविवारी ‘यलो’ अलर्टचा दावा केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा,विदर्भातही पावसाचा जोर वाढेल, असं हवामान विभागानं सांगितलं आहे. दक्षिण कोकणात सोमवार पासून अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, मुंबई ठाण्यासह उ कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे
20-21 जूनला काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड आणि इतर लगतच्या भागासाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले आणि फारच कमी पाऊस पडला. शनिवारी सकाळी 8.30 वाजता झालेल्या पावसाचे 24 तासांत, IMD च्या कुलाबा वेधशाळेने 12.6 मिमी पावसाची नोंद केली, तर सांताक्रूझ वेधशाळेत 1 मिमी पावसाची नोंद झाली. कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळांनी या हंगामात एकूण 142.5 मिमी आणि 99.1 मिमी पावसाची नोंद केली आहे.
20 व 21 जूनला जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने इशारा दिला आहे. 20 जून रोजी 40-50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह 60 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि त्याजवळ जाऊ नये, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.