मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक, पुढच्या 48 तासात अतिवृष्टीचा इशारा

मुंबईसह ठाणे, कल्याण आणि कोकण परिसरात येत्या 48 तासात जोरदार अतिवृष्टीचा इशारा (IMD prediction) देण्यात आलाय. नाशिक, मरावठवाड्यात हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही चांगला पाऊस अपेक्षित आहे. पण पावसामुळे मुंबईकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक, पुढच्या 48 तासात अतिवृष्टीचा इशारा
Follow us
| Updated on: Jul 27, 2019 | 5:46 PM

मुंबई : भारतीय हवामान विभाग (IMD prediction) ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासात राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण आणि कोकण परिसरात येत्या 48 तासात जोरदार अतिवृष्टीचा इशारा (IMD prediction) देण्यात आलाय. नाशिक, मरावठवाड्यात हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही चांगला पाऊस अपेक्षित आहे. पण पावसामुळे मुंबईकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1679.50 मिमी पाऊस

गेल्या 24 तासात ठाणे जिल्ह्यात तब्बल 1 हजार 679.50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याणमध्ये झालाय.

पावसाची आकडेवारी 27 जुलै 2019

ठाणे – 160.00mm

कल्याण – 231.40mm

मुरबाड – 332.00mm

उल्हासनगर – 296.00mm

अंबरनाथ – 280.60mm

भिवंडी  – 185.00mm

शहापूर  – 195.00mm

विदर्भ मराठवाड्याला अजूनही पावसाची प्रतीक्षा

पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई विभागात समाधानकारक पाऊस झाला असला तरी मराठवाडा मात्र पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यात अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही. शिवाय विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला असला तरी धरणांमध्ये मात्र पाणीसाढ्यात वाढ झालेली नाही.

पुणे जिल्ह्यात मुसळधार

गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यात (Pune Rain) शुक्रवारपासून हजेरी लावली आहे. या पावसामुळे (Pune Rain) आळंदीमधील इंद्रायणी नदी (Indrayani River) दुथडी भरून वाहू लागली आहे. आंद्र आणि वडविळे धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने इंद्रायणी नदी दुथडी वाहू लागली. तर लोणावळ्यातही विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे भुशी डॅमकडे जाणारा मार्गही पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.