Helmet Compulsory: मुंबई वाहतूक पोलिसांकडून रोज 500 जणांवर कारवाई; मुंबईच्या टोल नाक्यांवर हेल्मेट न घालणाऱ्यांवर थेट कारवाई
मुंबईत ही कारवाई कडक करण्यात आली असून वाहतून पोलिसांकडून दोन शिफ्टमध्ये ट्रॅफिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांकडून रोज 500 जणांवर कारवाई होत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे.
मुंबईः मुंबई वाहतूक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) सहप्रवाशांसाठी हेल्मेटसक्तीची (Helmet enforcement) दिलेली 15 दिवसांची मुदत संपताच गुरुवारपासून धडक कारवाई (Direct Action) सुरू करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांकडून आदेश मिळताच पहिल्याच दिवशी हेल्मेट परिधान केले नसलेल्या 3421 सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती. चालक, सहप्रवासी मिळून एकाच दिवशी 6271 जणांवर ई-चलान जारी करण्यात आले. त्यामुळे चालक आणि सहप्रवासी असे दोघांनीही हेल्मेट परिधान करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता मुंबईच्या टोल नाक्यांवर दुचाकीस्वारांवर हेल्मेट न घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.
दोन शिफ्टमध्ये ट्रॅफिक पोलीस तैनात
मुंबईत ही कारवाई कडक करण्यात आली असून वाहतून पोलिसांकडून दोन शिफ्टमध्ये ट्रॅफिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांकडून रोज 500 जणांवर कारवाई होत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे.
वाहतूक विभागाकडून पत्रक प्रसिध्द
मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या मुख्यालयाकडून 25 मे रोजी एक पत्रक प्रसिध्द करण्यात आले होते. त्यामध्ये मुंबईमधील अनेक दुचाकीस्वार हे विनाहेल्मेट दुचाकी चालवत असल्याचे म्हटले होते, तसेच दुचाकीस्वाराच्या मागे बसलेली व्यक्तीही हेल्मेटचा वापर करत नसल्याचा उल्लेख त्यामध्ये करण्यात आला होता.
पाठीमागे बसलेली व्यक्तीलाही हेल्मेट
नियम मोडून वाहनधारक दुचाकी चालवतात असे निदर्शनास आल्यानंतर दुचाकीस्वार आणि त्यांच्या पाठीमागे बसलेली व्यक्तींनी हेल्मेट वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यासाठी पोलिसांनी 15 दिवसांची मुदतही देण्यात आली होती. त्यामुळे आता मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाची धडक कारवाई सुरू झाली आहे. मोटार वाहन कायदा 1988 कलम 129 सह 194 ड अंतर्गत मुंबईभर कारवाईला वाहतून पोलिसांनी सुरुवात केली आहे.
हेल्मेट नसेल तर 500 रुपये दंड
मुंबई पोलिसांनी आदेश जारी केल्याप्रमाणे दुचाकीवर बसणाऱ्या दोघांनीही हेल्मेट वापरणे बंधनकारक असल्याचे सांगत हेल्मेट नसेल तर 500 रुपये दंड भरण्याच्या सूचना मुंबई वाहतूक पोलीस करत आहेत.