मनोज जरांगे यांचं मुंबईतील आंदोलन फसणार?, कोर्टात जनहित याचिका; दावा काय?
मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या वेळेमध्ये आरक्षण न दिल्याने मुंबईमध्ये येण्याचा इशारा दिला होता. येत्या 20 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानात आम्हाला द्यावं अशी मागणीही केली होती. पण जरांगे मुंबईमध्ये येण्याआधी हे आंदोलन फसणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. काय आहे कारण जाणून घ्या.
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता ;चांगलाच तापलेला आहे. मनोज जरांगे यांनी येत्या 20 जानेवारीला मुंबईमध्ये येत उपोषण करणार असल्याचं सांगितलं आहे. मनोज जरांगे यांनी सर्व मराठा समाजाला मोठ्या संख्येने आझाद मैदानावर येण्याचं आवाहन केलं आहे. करोडोच्या संख्येने मराठे मुंबईमध्ये येणार आहेत, सरकारने आमची सोय करावी, आता आरक्षण घेऊनच माघारी येणार असल्याचं सांगितलं आहे. आता दिवस जवळ येऊ लागले आहेत मात्र त्याआधी जरांगे पाटील यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे.
मनोज जरांगे यांचं आंदोलन फसणार?
मनोज जरांगे याच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मनोज जरांगे यांनी 20 तारखेला मुंबईत आंदोलन करु नये यासाठी रही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते हेमंत पाटील यांच्याकडून याचिका दाखल यांनी दाखल केलीये.
याचिकेत नेमकं काय म्हटलंय?
ओबीसी आणि मराठा दोन्ही समाजाने आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी मागितली आहे. याच दिवसापासून दोन्ही समाजाने आंदोलनाचा इशारा दिलाय. यामुळे दोन्ही समाज समोरासमोर येवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. 2 कोटी लोकांसोबत मुंबईत येणार असल्याचे मनोज जरांगे़चे वक्तव्य आहे. यापैकी एक कोटी मराठा बांधव मुंबईत आले तर मुंबई वेठीस धरली जावू शकते. मुंबईच्या गतीमानतेवर याचा परिणाम पडेल. मुबईकरांना याचा नाहक त्रास होईल. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरावर याचा परिणाम पडेल. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर न्यायालयाने योग्य निर्णय द्यावा, असं हेमंत पाटील यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे यांनी जेव्हा जेव्हा आंदोलन केली तेव्हा सरकारने त्यांच ऐकलं. मात्र आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईला वेठीस धरायला निघाले आहे. त्याला आम्ही आक्षेप घेतलाय आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. मनोज जरांगे आणि ओबीसी समाज यापैकी कुणालाही आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देवू नये ही मागणी केली असल्याचं हेमंत पाटील यांनी म्हटलं आहे.