दिल्ली आणि मुंबईसह देशातील पाच शहरात हाय अलर्ट
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय वायुसेनेने हल्ला केल्यानंतर पुढच्या 72 तासांसाठी भारतातील काही शहरात हाय अलर्टचा ईशार देण्यात आला आहे. यामध्ये दिल्ली आणि मुंबईसह पाकिस्तानच्या सीमारेषेवर असलेल्या पंजाब, गुजरात आणि राजस्थानचा समावेश आहे. गुप्तचर यंत्रनेच्या माहितीनुसार पाकिस्तानी सैन्यांकडून भारताला धोका नाही. मात्र काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांकडून भारताला धोका असल्याचे सांगितले […]
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय वायुसेनेने हल्ला केल्यानंतर पुढच्या 72 तासांसाठी भारतातील काही शहरात हाय अलर्टचा ईशार देण्यात आला आहे. यामध्ये दिल्ली आणि मुंबईसह पाकिस्तानच्या सीमारेषेवर असलेल्या पंजाब, गुजरात आणि राजस्थानचा समावेश आहे. गुप्तचर यंत्रनेच्या माहितीनुसार पाकिस्तानी सैन्यांकडून भारताला धोका नाही. मात्र काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांकडून भारताला धोका असल्याचे सांगितले आहे. यामुळे काही शहारात हाय अलर्ट आणि बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. उत्तर आणि पश्चिम भारतात परमाणू प्रतिष्ठान, एअरबेस, नौसेना कमान, सैन्याचे शिबीर आणि छावणी श्रेत्र यांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा आणि बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पंजाबमधील पाच जिल्ह्यातील सुरक्षेत वाढ
गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने दहशतवाद्यांना रोखण्यासाठी कडक सुरक्षा आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहे. सीमावर्ती राज्य पंजाबचे पाच जिल्हे गुरदासपूर, तरतारन, अमृतसर, फिरोजपूर आणि फाजिल्का हे पाकिस्तानच्या सीमेजवळ आहेत. पंजाबला पाकिस्तानची 553 किमी. लांबीची सीमारेषा लागली आहे. अशामध्येच या जिल्ह्यात डीसी आणि एसएसपीच्या नागरिकांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
राजस्थान आणि गुजरातमध्ये हाय अलर्ट
दरम्यान, पंजाबशिवाय राजस्थानही पाकिस्तानच्या सीमेवर आहे. राजस्थानला पाकिस्तानची 1048 किमी लांबीची सीमारेषा लागली आहे. अशामध्येच येथे एप्रिलपर्यंत संध्याकाळी 6 ते 7 वाजता आतंरराष्ट्रीय सीमेपासून पाच किमी परिसरात नागरिकांना येण्या जाण्यास बंदी घातली आहे. गुजरातमध्येही प्रशासनाने हाय अलर्टची सुचना दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सीमारेषेवर सुरक्षा वाढवली आहे. यासोबतच गुप्तचर विभागाच्या काही अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चाही केली आहे.
मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सैन्याला, बीएसएफ, तटरक्षक दलाला सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच भारतीय मच्छीमारांना आतंरराष्ट्रीय समुद्री सीमेच्या जवळ ठेवा. यामुळे त्यांना सुरक्षीत परत आणले जाईल.
जम्मू-काश्मीरवर विशेष लक्ष
स्लीपर सेल आणि काश्मीरमधील सक्रीय जैश-ए-मोहम्मदच्या कॅडरकडून सध्या भारताला धोका आहे. बालाकोटवर झालेल्या हल्ल्यामुळे काश्मीरवर विशेष लक्ष दिले जात आहे. जैशच्या दहशतवादी संघटनेकडून काही दहशतवादी कारवाई होऊ शकते. कारण भारताच्या वायूसेनेने केलेल्ल्या हल्ल्यात त्याचे नातेवाईक सुद्धा मारेले गेले आहेत. बीएसएपला पुढच्या तीन दिवसांसाठी सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.