घरं घेण्यासाठी मुंबईकरांची ना ठाणे, ना नवी मुंबईला पसंती! वाचा कुठे खरेदी करतायत मुंबईकर घर खरेदी?

गेल्या तीन महिन्यात एकूण 6439 घरांची खरेदी करण्यात आली आहे. एकूण महसूलात 45 टक्के वाटा हा घर खरेदीचा आहे.

घरं घेण्यासाठी मुंबईकरांची ना ठाणे, ना नवी मुंबईला पसंती! वाचा कुठे खरेदी करतायत मुंबईकर घर खरेदी?
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 1:56 PM

मुंबई : मुंबईत स्वत:चं हक्काचं घर खरेदी करणं हे प्रत्येक मुंबईकराचं स्वप्न असतं (Highest Number Of Property Purchases In Mumbai). मात्र, मुंबईतील घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मुंबईतील जमिनीला सोन्यापेक्षाही जास्त किंमत आहे. मात्र, तरीही मुंबईकरांची ओढ ही मुंबईतील घरांनाकडेच आहे (Highest Number Of Property Purchases In Mumbai).

गेल्या तीन महिन्यात एकूण 6439 घरांची खरेदी करण्यात आली आहे. एकूण महसूलात 45 टक्के वाटा हा घर खरेदीचा आहे. त्यामुळे अजूनही मुंबईकरांची पहिली पसंती ही जुन्या मुंबईलाच आहे.

यामध्ये सायन ते कुलाबा भागात मालमत्ता खरेदी सर्वाधिक झाली आहे. तीन महिन्यात 6439 घरांची खरेदी झाली आहे. त्याशिवाय, कुर्ला बोरीवलीलाही अधिक पसंती आहे.

सर्वात कमी व्याजदर, मुद्रांक शुल्कातील कपात आदि सवलतींमुळे डिसेंबर महिन्यातील मालमत्ता खरेदीत अभूतपूर्व वाढ झाल्याचे दिसून आले. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीचा विचार केल्यास जुन्या मुंबईत सर्वाधिक घर खरेदी झाली. म्हणजे लॉकडाऊन आहे, धंदे बंद आहेत तरीसुद्धा लोकांची घर खरेदीसाठी देशातल्या सर्वात महागड्या समजल्या जाणाऱ्या जुन्या मुंबईलाच पसंती मिळाली.

मुंबईकरांची पसंती असलेल्या कुलाबा, सायनमध्ये जमिनीचा भाव काय?

कुलाबा – 55,000 ते 1 लाख रुपये प्रति चौरस फूट

सायन – 30,000 ते 50,000 हजार रुपये प्रति चौरस फूट

सायन आणि कुलाबादरम्यान – 30, 000 ते 1 लाख रुपये प्रति चौरस फूट

मुंबईत घरं सहा लाखांनी स्वस्त होणार

मुंबईतील घरं सहा लाखांनी स्वस्त होणार आहेत. बांधकाम व्यावसायिकांना निवासी संकुल उभारणीसाठी आवश्यक असलेल्या प्रीमियम शुल्कात कपात केल्याने, आता घरे स्वस्त होण्याची आशा बळावली आहे.हा लाभ घेणाऱ्या बिल्डरांना ग्राहकांचे मुद्रांक शुल्क स्वत: भरायचे आहे. पण, निव्वळ प्रीमियम कपातीचा लाभ ग्राहकांना मिळाल्यास मुंबईसारख्या शहरात सरासरी 6 लाख रुपयांपर्यंत घरे स्वस्त होऊ शकतात (Highest Number Of Property Purchases In Mumbai).

बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रीमियमवर (अधिमूल्य) 31 डिसेंबर 2021 पर्यंत 50 टक्के सूट देण्याचा तसेच जे प्रकल्प या सवलतीचा लाभ घेतील, त्यांना ग्राहकांतर्फे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला.

Highest Number Of Property Purchases In Mumbai

संबंधित बातम्या :

घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; सरकारकडून मुद्रांक शुल्कात सवलत

ठाकरे सरकारचे महत्त्वाचे 8 निर्णय; विकासकांना प्रीमियममध्ये 50% सवलत मिळणार

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.