Petrol Diesel Rate: मुंबई-पुण्यात इंधनाच्या दरात उसळी; जळगावात अफवेमुळे पेट्रोल पंप एका दिवसात रिकामा
लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेले व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे. | Petrol diesel price rates
मुंबई: लॉकडाऊनच्या संकटामुळे सामान्य लोकांना आर्थिक चणचण जाणवत असतानाच आता पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel price) दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये बुधवारी पेट्रोल (Petrol price) आणि डिझेलच्या दरात पुन्हा काही पैशांची वाढ नोंदवण्यात आली. आज मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलचा दर 98.36 तर डिझेलचा दर प्रतिलीटर 89.75 इतका आहे. (Petrol and diesel rates in Maharashtra)
पेट्रोल आणि डिझेलचा हा वरच्या दिशेचा प्रवास आणखी काही काळ सुरु राहू शकतो. परिणामी अगोदरच लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेले व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल- डिझेलचा आजचा दर काय?
मुंबई: पेट्रोल- 98.36 , डिझेल 89.75 पुणे: पेट्रोल- 98.06, डिझेल 88.08 नवी मुंबई- 98.56, डिझेल 89.94 नाशिक: पेट्रोल- 98.76, डिझेल 88.76 औरंगाबाद: पेट्रोल- 99.60, डिझेल 90.99
जळगावात अफवेमुळे एका दिवसात पेट्रोल पंप रिकामा
जळगावच्या मुक्ताईनगर परिसरात मंगळवारी एका अफवेमुळे लोकांनी पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी केली होती. पुढील दहा दिवस पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, अशी अफवा या भागात पसरली होती. त्यामुळे कुऱ्हाड येथील दोन्ही पेट्रोल पंपांवर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. यापैकी एका पेट्रोल पंपातील इंधनाचा साठा पूर्णपणे संपला.
याविषयी, पेट्रोल पंपाच्या चालकाला विचारले असता त्याने ही अफवा फेटाळून लावली. पेट्रोल-डिझेल नियमित मिळणार आहे, असे त्यांनी लोकांना सांगितले. मात्र, तरीही लोकांनी लांबच लांब रांगा लावून पेट्रोल-डिझेल विकत घेतले.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?
मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.
सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.
संबंधित बातम्या:
Gold Rate Today: कोरोनाच्या संकटात सोने झाले स्वस्त, 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती?
ही सरकारी बँक देतेय स्वस्तात घरं अन् दुकान खरेदीची संधी, 12 मे रोजी लिलाव
पतंजली बिस्किटचा व्यवसाय लवकरच रुचि सोयाच्या हाती, इतक्या कोटींचा होत आहे सौदा