Hindustani Bhau Arrested | हिंदुस्तानी भाऊला अटक, धारावी पोलिसांची कारवाई, कोर्टासमोर हजर करण्याची शक्यता
धारावी येथे विद्यार्थी आंदोलन आणि गर्दी प्रकरणी हिंदुस्तानी भाऊला अटक करण्यात आलंय. धारावी पोलिसांनी ही कारवाई केलीय.
मुंबई : धारावी येथील विद्यार्थी आंदोलन आणि गर्दी प्रकरणी हिंदुस्तानी भाऊला (Hindustani Bhau) अटक करण्यात आलंय. धारावी पोलिसांनी ही कारवाई केलीय. विद्यार्थ्यांना (Student Protest) चिथावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक केल्यानंतर हिंदुस्तानी भाऊला नायर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर आता भाऊला सकाळी दहा वाजता बांद्रा न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकते. 31 जानेवारी रोजी धारावी परिसरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. ऑनलाईन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारले होते. या विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप हिंदुस्तानी भाऊवर आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी हिंदुस्तानी भाऊ हजर होता. तसा एक व्हिडीओ समोर आला होता. विद्यार्थ्य़ांना ऑफलाईन परीक्षा (Exams) देण्याची सक्ती का केली जात आहे, असा सवाल हिंदुस्तानी भाऊने केला होता. त्यानंतर आता पोलिसांनी त्याच्यावर ही अटकेची कारवाई केली आहे.
आगावीची कुमक मागवली, पोलीस बंदोबस्त वाढवला
हिंदुस्तानी भाऊवर वेगवेगळ्या कलमांतर्गत धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊला धारावी पोलीस ठाण्यात आणलं. भल्या पहाटे त्याला नायर रुग्णलयातदेखील तपासणीसठी नेण्यात आलं होतं. त्यानंतर आता पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली आहे. पोलीस अधिकारी आल्यानंतर भाऊला कोणत्या कोर्टासमोर हजर करावे यावर निर्णय घेतला जाणार आहे. 31 जानेवारी रोजी झालेल्या आंदोलनात काही असामजिक तत्वे तसेच गावगुंड सामील झाले होते. त्यामुळे ते आंदोलन चिघळले. आंदोलन चिघळल्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला, असे पोलिसांनी सांगितले आहे.
पाहा व्हिडीओ :
नेमकं प्रकरण काय आहे ?
31 जानेवारी रोजी धारावी नाईंटी फिट रोडवर विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेच्या निषेधार्थ रस्त्यावर मोठे आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या या गोंधळामुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला होता. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात म्हणून धारावी परिसर दणाणून सोडला होता.
इतर बातम्या :