हिंदुत्वापासून ते संघावरील बंदीपर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील 10 खणखणीत मुद्दे
दसरा मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वापासून ते अगदी संघापर्यंत मुद्दे मांडत त्यांचे गुणगानही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गायिले.
मुंबईः राज्यात दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे (dussehra rally) झाल्याने येथी नागरिकांना मोठी राजकीय पर्वणी मिळाली. शिवाजी पार्कवरुन उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर एकनाथ शिंदेंनीही (Eknath Shinde) पलटवार करत खरी शिवसेना आणि हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करताना त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्यालाही हात घातला. काँग्रेस, राष्ट्रवादीवर बरोबर जाण्याचा प्रसंग आला म्हणून तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा सोडून दिला, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली म्हणत त्यांनी जोरदार टीकास्त्र केले.
यावेळी त्यांनी हा विचार तुम्ही सोडून दिला त्यामुळे तुम्हाला त्याचा नैतिक अधिकार तरी आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
1. राज्यातील वेगवेगेळ्या प्रश्नासाठी शिवसैनिकांनी रक्त सांडलं, मात्र तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी राष्ट्रवादीकडे स्वाभिमान गहाण ठेवला आहे अशी टीकाही त्यांनी केली.
2. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पक्षाचा हरामखोर अस उल्लेख केला, त्या राष्ट्रवादीच्या हातचे रिमोट झाला आणि शिवसेना त्यांच्या दावणीला बांधली अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.
3. मागील तीन महिन्यापासून गद्दार आणि खोके या शब्दांशिवया तुम्ही टीका केली नाही. होय गद्दारी झाली पण ही गद्दारी 2019 सालीच झाली. त्याचवेळी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आणि हिंदुत्वाशी गद्दारी केली, त्यामुळे तुम्ही जनतेशी बेईमानी केली अशीही त्यांनी टीका केली.
4. ज्यावेळी अडीच वर्षाचं सरकार बनत होतं, तेव्हाच आमच्या आमदारांनी ही आघाडी चुकीची असल्याचे सांगितली.ही आघाडी महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारी असली तरी ती आम्ही मान्य केली, पण जेव्हा बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि विचार गुंडाळून टाकले. तेव्हा मात्र आम्हाला भूमिका घ्यावी लागली.
5.पीएफआयला बंदी घातल्यानंतर संघावर बंदीची मागणी करण्यात आली. ही मागणी अजब होती. कारण या देशात संघाचं मोठं योगदान आहे. देशात आपत्ती येते तेव्हा संघ पुढे असतो. राष्ट्र उभारणीत संघाचा हात कुणीच धरू शकत नाही असा गौरवही त्यांनी संघाचा केला.
6. शिवसेनेबद्दल बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली यावेळी ते म्हणाले की, शिवसेना ही काय तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. ही या लोकांच्या घामातून शिवसेना बांधली गेली आहे. ती कुणाच्याही दावणीली बांधता येणार नाही.
7. पीएफआयवर ज्या वेळी कारवाई झाली त्यावेळी तुम्ही एकही शब्द उच्चारला नाही. केंद्र सरकार आणि अमित शहांनी घेतलेला हा निर्णय योग्यच होता. राज्यातही पीएफआयला ठेचलं जाईल. या राज्याविरोधात कारवाया खपवून घेतलं जाणार नाही असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
8. ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची. ना एकनाथ शिंदेंची. ही शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आहे. शिवसैनिकांची आहे. आम्ही विचार सोडला नाही. सोडणार नाही. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य महत्त्वाचं आहे.
9. बाळासाहेब म्हणत होते, हे शिवसैनिक आहेत म्हणून मी शिवसेनाप्रमुख आहे. आमदार गेले. खासदार गेले. तरी मीच आहे. अजूनही तुमचे डोळे उघडत नाहीत, हे दुर्देव असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधाला.
10.तुम्ही वर्क फ्रॉम होम करत होता म्हणत त्यावेळी आम्ही होम विदाऊट वर्क करत होतो. घर दार सोडून काम करत होतो. कोविड काळात आम्ही पीपीई कीट घालून लोकांमध्ये गेलो असल्याचे सांगत जीवाची पर्वा केली नाही. सर्वांना मदत केली असंही त्यांनी सांगितले.