कधी नव्हे ते चर्चगेट स्थानकात पावसाचे पाणी साचले, मुंबई महानगर पालिकेने केला तातडीने खुलासा

दक्षिण मुंबईत महर्षी कर्वे रोडवर तसेच चर्चगेट आणि मरिनलाईन रेल्वे स्थानकात प्रथमच गुरुवारी पावसाचे पाणी साचल्याने खळबळ उडाली होती. कोस्टल प्रकल्पाने हे पाणी साचल्याचे म्हटले जात होते. परंतू मुंबई महानगर पालीकेने खुलासा करीत नेमके कारण सांगितले.

कधी नव्हे ते चर्चगेट स्थानकात पावसाचे पाणी साचले, मुंबई महानगर पालिकेने केला तातडीने खुलासा
churchgate Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 9:21 PM

मुंबई | 27 जुलै 2023 : दक्षिण मुंबईत सहसा पावसाळ्यात कधी पाणी साचत नाही हा आजवरचा अनेक वर्षांचा शिरस्ता. परंतू गुरुवारी चक्क चर्चगेट रेल्वे स्थानकाचे रुळ पाण्याखाली गेले. त्यामुळे या ऐतिहासिक स्थानकात इतक्या वर्षांनी प्रथमच पावसाचे पाणी साचल्याचे दृश्य होते. इतक्या वर्षांनी थेट चर्चगेट ते मरीनलाईन स्थानकात पाणी साचण्यामागे कोस्टल रोडसाठी केलेला समुद्रातील भराव जबाबदार असल्याचे म्हटले जात होते. परंतू पालिकेने तातडीने याबाबत खुलासा करीत नेमके कारण सांगितले.

मुंबईत किती पाऊस कोसळला तरी ब्रिटीशांनी वसवलेल्या दक्षिण मुंबईत कधी पावसाने पुर आला आहे. असे दृश्य दिसत नाही. परंतू गुरुवारी हवामान विभागाने जोरदार पर्जन्यवृष्टीचा दिलेल्या इशाऱ्यानंतर चक्क चर्चगेट स्थानकात पाणी साचल्याचे फोटो समाजमाध्यमात व्हायरल होऊ लागले. यासाठी कोस्टल रोडच्या बांधकामासाठी समुद्रात टाकलेला भराव किंवा अंडरग्राऊंड मेट्रोचे काम जबाबदार असल्याचे म्हटले जात होते.

हे ट्वीट पाहा –

रोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही

दक्षिण मुंबईमध्ये पावसाबरोबरच जोरदार लाटांसोबत वाहून आलेले लहान आकाराचे खडक पाटण जैन मार्गाच्या पर्जन्य जल पातमुखात (आऊटफॉल ) अडकले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ए विभाग, मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि पर्जन्य जल वाहिन्या विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून हे पातमुख मोकळे केले. आणि त्यानंतर या पाण्याचा निचरा झाला. त्यामुळे मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या भरावामुळे रुळांवर पाणी आल्याच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई महानगर पालिका प्रशासनाने केले आहे.

'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप.
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका.
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?.
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?.
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली.
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल.
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा.
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?.
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा.