‘हिट अँड रन’ च्या घटनेने मुंबई हादरली; भरधाव कार चालकाने महिलेले नेले फरफटत, वरळीत भल्या पहाटे काळाचा घाला
Worli Hit And Run Accident : राज्यात हिट अँड रनच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. मोठमोठ्या शहरातच नाही तर गावखेड्यातही पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरुन जावे लागते. भल्या पहाटेच भरधाव कारमुळे मुंबईत एका महिलेला प्राण गमवावा लागला.
पुण्यातील कल्याणीनगरमधील हिट अँड रन केसने संपूर्ण देशाला हादरा दिला. त्यानंतर असे प्रकार कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसून आले. राज्यातच गेल्या महिन्यात असे अनेक प्रकार समोर आले आहे. त्यात काहींना नाहक जीव गमवावा लागला आहे. आता वरळीतून हिट अँड रन च्या घटनेने मुंबई हादरली आहे. यात एका महिलेला तिचे प्राण गमवावे लागेल आहे. तर कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे.
वरळीत ‘हिट अँड रन’ची घटना
वरळीत भल्या पहाटे हिट अँड रनची घटना घडल्याचे समोर आले आहे. मच्छी आणण्याठी गेलेल्या कोळी दांपत्याला पहाटे ५:३० वा चार चाकीने फरफटत नेले. वरळीतील ॲट्रीया मॉलजवळ ही घटना घडल्याचे समोर आले आहे. वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा दांपत्य हे सकाळी ससून डॉकला मच्छी आणण्यासाठी गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना एका चारचाकीने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.
महिलेला नेले फरफटत
दुचाकीवर मोठ्याप्रमाणात मच्छी वाहून नेत असल्याने त्यांच्या दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि दोघंही चार चाकीच्या बोनटवर पडले. त्यावेळी वेळीच नवऱ्याने कारच्या बोनटवरून बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला स्वत:ला बाजूला होता आलं नाही. अशातच अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने कार काही थांबवली नाही आणि त्याने कार दामटली. त्यात कोळी महिलेला फरफटत गेली.
अपघातात महिलेचा मृत्यू
कार चालकाने वेळीच कार थांबवली असती तर कदाचित महिलेचा जीव वाचला असता. त्याने कार दामटल्याने ही महिला फरफटत गेली. त्यामुळे ती जखमी झाली. कोळी महिलेला उपचारासाठी नायर रुग्णालयात नेले असता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अपघातानंतर भेदरलेल्या कार चालकाने घटनास्थळाहून पोबारा केला. वरळी पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहे. राज्यात हिट अँड रनचे प्रकार वाढले आहे. पुण्यानंतर जळगाव, बुलढाणा आणि राज्यातील इतर शहरात असे प्रकार घडले आहे. या घटनांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.