मुंबईः राज्यातील राजकारण सध्या राज्यसभेच्या (Rajyasabha Elecation) निवडणुकीमुळे ढवळून निघाले आहे. राज्यातील विविध पक्षांनी आपापल्या उमेदवारांसाठी फिल्डींग लावली असली तरी सगळ्या राज्याचे लक्ष मात्र महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांकडे लागून राहिले आहे. राज्यसभेच्या उमेदवारांसाठी आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवारांसाठी त्यांच्या आमदारांचे मत महत्वाचे असले तरी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकुर (Hitendra Thakur) यांना मात्र ट्रायडंट हॉटेलमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला आमंत्रण देण्यात आले नाही.
हितेंद्र ठाकुर यांच्या बहुजन आघाडीची तीन मतं महत्वाचं असतानाही त्यांना बोलवण्यात आले नसल्याने त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जिथे आमंत्रण नाही, तिथे आम्ही जात नाही असे सांगितले आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील एकाही नेत्याने बैठकीला या म्हणून साधा फोनही केला नाही असं त्यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी हेही सांगितले की, महाविकास आघाडीची कदाचित ही बैठक आतल्या गोटातील बैठक असावी त्यामुळे आमंत्रण दिले गेले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जिथे आमंत्रण नाही, तिथे आम्ही जात नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.
हितेंद्र ठाकुर यांच्या बहुजन विकास आघाडी पक्षाकडे लोकसभेसाठी तीन मतं आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षालाही महत्व आले आहे, मात्र त्यांनी यावेळी सांगितले की, तिन्ही पक्षातील एकाही नेत्याने आपल्याला ट्रायडंटमधील बैठकाली या म्हणून सांगितेल नाही. त्यामुळे या बैठकीला जाणार नाही असे स्पष्ट केले.
हितेंद्र ठाकुर यांची आणि त्यांच्या पक्षाबरोबर चर्चा करणार असल्याचे महाविकास आघाडीचे नेते सांगत होते. मात्र या ट्रायडंटमधील बैठकीला त्यांना बोलवण्यात आले नाही. मात्र धनंजय महाडीक यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मात्र धनंजय महाडीक यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी जोरदार चर्चा झाली होती.