मुंबई लोकलमध्ये 50 वर्षांपूर्वी किती गर्दी असायची? पाहा फोटो
मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणून मंबई लोकल ट्रेनला ओळखलं जाते. दररोज या लोकल ट्रेनने लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या शहरात काम करण्यासाठी येतात. मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे. मात्र ही गर्दी गेले 50 वर्षापासून असल्याचे दिसत आहे. 50 वर्षापूर्वीचा मुंबईतील लोकल ट्रेनमधील गर्दीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल […]
मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणून मंबई लोकल ट्रेनला ओळखलं जाते. दररोज या लोकल ट्रेनने लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या शहरात काम करण्यासाठी येतात. मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे. मात्र ही गर्दी गेले 50 वर्षापासून असल्याचे दिसत आहे. 50 वर्षापूर्वीचा मुंबईतील लोकल ट्रेनमधील गर्दीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या फोटोतून स्पष्ट दिसत आहे की, आज मुंबई लोकल ट्रेनमध्ये ज्याप्रकारे गर्दी आहे तशीच गर्दी 50 वर्षापूर्वीही होती. 1970 च्या दशकातील हा फोटो आहे. यामध्ये मुंबईकर कशाप्रकारे लोकल ट्रेनला लटकून प्रवास करायचे ते दिसत आहे. नेहमीप्रमाणे खचाखच भरलेली लोकल ट्रेन 50 वर्षापूर्वीही याच अवस्थेत होती हे पाहून अनेकजण आश्चर्यचकीत होत आहेत.
ट्विटरवरील इंडिया हिस्ट्री पिक्स यावरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत मुंबईकरांनी अनेक मुंबईचे जुने फोटो पाहिले आहेत. मात्र मुंबई लोकलचा गर्दीचा फोटो कधी पाहिला नसावा. गर्दीने खचाखच भरलेल्या या ट्रेनमध्ये शिरण्यासाठी जागा नसल्याने अनेकजण या ट्रेनच्या डब्याच्या दारात तसेच अगदी खिडक्यांवरही चढून उभे असल्याचं दिसत आहेत.
1970s :: People During Rush Hour Commute In Bombay Local Train pic.twitter.com/YnkGV59DDz
— indianhistorypics (@IndiaHistorypic) April 2, 2019
हा फोटो 1970 च्या दशकातील असल्याचं ‘इंडिया हिस्ट्री पिक्स’ने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. “गर्दीच्या वेळी बॉम्बेमधील लोकल ट्रेनने प्रवास करणारे प्रवाशी”, असे कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने मात्र या फोटोला दुजोरा दिलेला नाही.