वांद्रे टर्मिनसबाहेर सकाळी पुन्हा परप्रांतिय मजुरांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
लॉकडाऊनदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत वांद्रे टर्मिनसजवळ परप्रांतिय मजुरांची गर्दी जमली आहे. Migrant Workers Gathered Bandra Station
मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यान लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊनदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत वांद्रे टर्मिनसजवळ सकाळी पुन्हा मोठ्या प्रमाणात परप्रांतिय मजुरांची गर्दी जमली होती. या स्थानकावरुन उत्तरप्रदेश आणि बिहारला जाणारी ट्रेन सुटणार असल्याचे काही जण सांगत आहेत. या घटनेचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. (Migrant Workers Gathered Bandra Station)
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पूर्वेला टर्मिनसबाहेर हजारो परप्रांतिय मजूर एकत्र जमा झाले. हे सर्व मजूर वांद्रे टर्मिनसच्या दिशेने धावत जात असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. आज दुपारी 4 वाजता उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणारी ट्रेन सोडली जाणार आहे, असे काहीजण सांगत आहेत. तसेच या व्हिडीओत चलते रहो, चलते रहो असा आवाजही ऐकायला येत आहे.
दरम्यान वांद्रे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ही गर्दी नियंत्रणात आणली. ही गर्दी नेमकी का जमली होती, वांद्रे स्थानकावरुन ट्रेन सोडण्यात येणार होती का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा – लॉकडाऊन वाढीला विरोध, गावी जाण्याच्या हट्टापायी वांद्रे येथे हजारोंची गर्दी
दरम्यान गेल्या महिन्यात 14 एप्रिलला वांद्रे स्थानकात अचानक परप्रांतिय मजूर जमले होते. वांद्रे येथे हजारोच्या संख्येने जमा झालेले कामगार मागील अनेक दिवसांपासून जवळच्याच वस्तीमध्ये राहतात. मात्र, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे आपली प्रचंड गैरसोय आणि हालअपेष्टा होत असल्याची कैफियत या कामगारांनी मांडली.
हे टाळण्यासाठीच आपल्या मूळगावी जाण्याचा हट्ट ते करत होते. त्यासाठीच ते वांद्रे रेल्वे स्टेशनबाहेर असलेल्या बस डेपो परिसरात जमा झाले होते.
गेल्या महिन्यात वांद्रे परिसरात जवळपास 4 हजार मजुरांचा जमाव जमल्याचा अंदाज होता. लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमाव आल्याने नियंत्रणासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता. या प्रकारानंतर वांद्रे रेल्वे स्थानक मुंबई महापालिकेने सॅनिटाइज केलं होतं. (Migrant Workers Gathered Bandra Station)
पाहा व्हिडीओ –
संबंधित बातम्या :
लॉकडाऊन वाढीला विरोध, गावी जाण्याच्या हट्टापायी वांद्रे येथे हजारोंची गर्दी
चिंता नको, तुम्ही माझ्या महाराष्ट्रात सुरक्षित आहात, मुख्यमंत्र्यांचा मजुरांना शब्द