Hunar Haat : भाजप नेत्यांनी मारला विविध खाद्यपदार्थांवर ताव, मुंबईकरांसाठी बीकेसीत हुनर हाट
या प्रदर्शनात 31 राज्यातील चार हजार पेक्षा अधिक कारागीर एकत्र आले असून आपल्या विविध राज्यातील हँडक्राफ्ट वस्तू, खाद्यसंस्कृतीचा दर्शन या हुनर हाट प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. 17 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत हे हुनर हाट सुरू असणार आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे भरवण्यात आलेले हे 40 वे हुनर हाट आहे.
मुंबई : आज हुनर हाट (Hunar Haat) प्रदर्शनाचं उद्घाटन बिकेसी एमएमआरडीए मैदानावर करण्यात आले. या प्रदर्शनात 31 राज्यातील चार हजार पेक्षा अधिक कारागीर एकत्र आले असून आपल्या विविध राज्यातील हँडक्राफ्ट वस्तू, खाद्यसंस्कृतीचा दर्शन या हुनर हाट प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. 17 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत हे हुनर हाट सुरू असणार आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे भरवण्यात आलेले हे 40 वे हुनर हाट आहे. या हुनर हाटचं उद्घाटन केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर (Anurag Thakur), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मुख्तार अब्बास नक्वी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं आहे. आपल्या देशाला मोठी खाद्यसंस्कृती आहे. तसेच मोठा औद्योगिक वारसाही आहे. अशा कार्यक्रमामुळे या दोन्ही गोष्टीत मोठी भर पडणार आहे. त्यामुळेच केंद्रीय मंत्रालयाकडून अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
LIVE | Inauguration of ‘40th Hunar Haat’ in #Mumbai with Hon Union Ministers @ianuragthakur ji & @naqvimukhtar ji #HunarHaat @hunarhaat https://t.co/FwTOntEWfi
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 17, 2022
रोजगार निर्मितीला मोठी चालना
कार्यक्रमात आज फुड स्टॉल वर जाऊन केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नकवी, अनुराग ठाकूर, खासदार मनोज कोटक प्रकाश जावडेकर आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खाद्यपदार्थांवर चांगलाच ताव मारला. विविध राज्यातील खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी मुंबईकरांनी खास येथे यावे आणि देशातील खाद्यसंस्कृती सुद्धा समजून घ्यावी असे आवाहन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे. अशा कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. तसेच जगभरातील बाजार पेठेत भारताने तयार केलेल्या वस्तू पोचत आहेत, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
भारतीय खाद्यपदार्थाचा जगभर डंका
भारतीय खाद्यसंस्कृती संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. जगभरातील खाद्यपदार्थांमध्ये भारतीय खाद्यपदापर्थाला मोठी मागणी असते. भारत हा मसाल्याचाही मोठा निर्यादार आहे. भारतातले मसाले हे जगभरात विकले जातात. भारतीय जेवणाची सर जगातील कोणत्याही जेवणाला येत नाही. अशा उपक्रमाद्वारे या खाद्यसंस्कृतीला मोठा हातभार लागणर आहे. त्यामुळे अशा उपक्रमांवर भर देण्यात येत आहे. या हटच्या उद्घाटनावेळी नेत्यांनाही हे स्वादीष्ट पदार्थ चाखण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळेच नेतेमंडळी या खाद्यांवर ताव मारताना दिसून आले.
Sanjay Raut: दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा डाव, संजय राऊत यांचा मोठा आरोप