‘मी घाबरणारा माणूस नाही, ते रक्तात नाही’, शरद पवार-मुख्यमंत्री भेटीवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

सिंधी समाज आक्रमक होत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, 'मी घाबरणारा माणूस नाही, ते रक्तात नाही' अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

'मी घाबरणारा माणूस नाही, ते रक्तात नाही', शरद पवार-मुख्यमंत्री भेटीवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 8:32 PM

मुंबई : उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा झालेल्या मेळाव्यात बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांच्यावर सिंधी समाजाने गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून आता राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. सिंधी समाज आक्रमक होत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, ‘मी घाबरणारा माणूस नाही, ते रक्तात नाही’ अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. त्याविषयावर बोलताना त्यांनी सांगितले की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी सांगितले की, सिंधी समाजाला माझ्याविरोधात भडकवण्याचे काम केले गेले आहे. त्यांनी सांगितले की, ज्या लोकांनी या व्हिडीओ विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याच विरुद्ध आधी गुन्हा दाखल करा अशी मागणी मी करणार आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करताना  एवढी घाई गडबड करत असाल तर आता तुमच्या वर्दीवर असलेले अशोक चक्र काढून त्यावर आता शिवसेनेचा धनुष्यबाण लावा असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.