माझा विरोध तिच्या नंगानाचाला, तिच्या धर्माचा काय संबंध…; चित्रा वाघ यांनी सगळा रागच माध्यमांवर काढला….
चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्या फॅशनवर टीका करताना म्हणाल्या की, आमची ही संस्कृती नाही, हे फॅशनच्या नावाखाली चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
बीडः अभिनेत्री उर्फी जावेदविरोधात (Uorfi Javed) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पुकारलेले आंदोलन दिवसेंदिवस नव्या वादात अडकत चालले आहे. उर्फीच्या फॅशनविरोधात (fashion)आणि तिच्या नंगानाचा विरोधात असलेला हा लढा दिवसेंदिवस अधिक तीव्र करू असा विश्वासही चित्रा वाघ यांनी व्यक्त केला असला तरी त्यांनी उर्फी विरोधात पुकारलेल्या आंदोलनामध्ये ज्या लोकांनी धर्म आणला आहे.
त्यांच्या आई, बाबा, भाऊ आणि त्यांच्या बहिणीलाच त्यांनी अनेक सवाल विचारले आहेत. माझा विरोध उर्फी जावेदला नसून तिच्या सार्वजनिक ठिकाणच्या नंगानाचाल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अभिनेत्री उर्फी जावेदच्या फॅशनवरून चाललेल्या वादावरून चित्रा वाघ यांनी थेट पत्रकार आणि माध्यमांवरच त्या भडकल्या आहेत. यावेळी त्या म्हणाल्या की, आमच्या मुलांचा आणि राजकारणाचा काहीच संबंध नाही. तरीही आमच्या मुलाचा आणि उर्फी जावेदचे फोटो तुम्ही का व्हायरल केले असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
माझा विरोध उर्फी जावेदल नसून तिच्या विकृतपणाला आणि तिच्या नंगानाचाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, तुमच्या घरात आई, बहिणी आहेत का नाहीत हा नंगानाच त्यांना मान्य आहे का विचार जरा त्यांनाच तुम्ही विचारता का असा सवालही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
फॅशनच्या नावाखाली चाललेला उर्फी जावेदचा नंगानाच आज थांबवणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या म्हणाल्या की, आज हा नंगानाच जर थांबवला नाही तर हा नंगानाच सगळ्या महाराष्ट्रात दिसणार आहे आणि हा माझा विश्वास आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना त्यांनी फॅशनच्या नावाखाली जर कोणी काय करत असेल तर ते आम्हाला मान्यही नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्या फॅशनवर टीका करताना म्हणाल्या की, आमची ही संस्कृती नाही, हे फॅशनच्या नावाखाली चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
प्रसिद्धीसाठी शरीराला चिंध्या लावून फिरताय हे तुम्हाला मान्यय आहे का असा सवाल करत त्यांनी टीकाकारांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्या म्हणाल्या की माझ्यावर टीका करणाऱ्यांनी ती त्या धर्माची आहे म्हणून चित्रा वाघ यांचा विरोध असल्याची म्हटले आहे.
मात्र असा कोणता धर्म आहे आणि सांगतो की असं उघडं नागडं फिरा म्हणून त्यामुळे ती कोणत्या धर्माची आहे हे महत्वाचं नाही तर तिच्या विकृतीचा प्रश्न आहे असंही आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांना म्हटले आहे. त्यामुळे माझा विरोध तिच्या नंगानाचाला आहे, तो बंद व्हायला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.