पूजा खेडकरचं अख्खं कुटुंब वादात; आईविरोधात गुन्हा, वडिलांचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल, बंगल्यावरही नोटीस

IAS Pooja Khedkar Mother Manorama Khedkar Bungalow Notice : आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याला नोटी देण्यात आली आहे. या प्रकरणातील महत्वाच्या घडामोडी, वाचा सविस्तर......

पूजा खेडकरचं अख्खं कुटुंब वादात; आईविरोधात गुन्हा, वडिलांचा 'तो' व्हीडिओ व्हायरल, बंगल्यावरही नोटीस
पूजा खेडकर आणि त्यांची आई मनोरमा खेडकरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 13, 2024 | 6:06 PM

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पूजा खेडकर यांच्यासोबतच त्यांचं अख्ख कुटुंब वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. आधी आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधात पुणे जिल्ह्यातील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आता मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याला नोटीस लावली आहे. इतकंच नव्हे तर पूजा खेडकर यांच्या वडिलांचे कारनामे हे लेकीच्या एक पाऊल पुढे आहेत. दिलीप खेडकर यांनी खाजगी वाहनावर ‘भारत सरकार’ बोर्ड वापरल्याचं छाननीत समोर आहे. इतकं थोडं म्हणून आता बंगल्याचा काही भाग हा रस्त्यावर अतिक्रमण करून बांधल्याचं समोर आलं आहे.

मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याला नोटीस

पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याला नोटीस लावण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस लावली आहे. रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर अतिक्रमण झालं आहे. हे अतिक्रमण 7 दिवसात काढून घ्या अन्यथा कारवाई करणार असं या नोटीसमध्ये म्हणण्यात आलं आहे.

आई मनोरमा यांच्या विरोधात गुन्हा दाखल

मुळशीमधील व्हायरल व्हीडीओनंतर अखेर वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर पौड पोलीस स्टेशनंमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरमा खेडकर यांच्यासह दिलीप खेडकर, अंबादास खेडकर, दोन पुरुष बाउंसर, दोन महिला बाउन्सर आणि घटनेवेळी त्यांच्यासोबत आलेल्या इतर गुंड व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती. ती ताब्यात घेताना शेजाऱ्यांचीही न्यायप्रविष्ट असलेली जमीन ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. यावेळी शेजारी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी विरोध केला तेव्हा मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन  त्या ठिकाणी पोहोचल्या. त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले होतं. त्याचा हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर तब्बलं एक वर्षानंतर त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

वडिलांचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकरांचा नवा कारनामा समोर आला आहे. दिलीप खेडकर यांनी खाजगी वाहनावर ‘भारत सरकार’ बोर्ड वापरल्याचं छाननीत समोर आलं आहे. थर्मोवेरिटा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पजेरो गाडीवर ‘भारत सरकार’चा बोर्ड लावला. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्विट करत चौकशीची मागणी केली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.