प्रवीण परदेशींसह अनेक बड्या अधिकाऱ्यांची बदली, कुणाची नियुक्ती कुठे?

मुंबई महापालिका आयुक्तांनाचीच नाही तर अतिरिक्त आयुक्त, मदत व पुनर्वसन सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग सचिवांचीही बदली करण्यात आली आहे.

प्रवीण परदेशींसह अनेक बड्या अधिकाऱ्यांची बदली, कुणाची नियुक्ती कुठे?
Follow us
| Updated on: May 08, 2020 | 8:59 PM

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची (IAS Transfers In BMC) तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. राज्यातील ठाकरे सरकारने मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या जागी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव इक्बाल सिंह चहल यांच्याहाती मुंबईच्या आयुक्तपदाची सूत्रे दिली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आवरत नसल्याने ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे. तर प्रवीण परदेशी यांना आता नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी (IAS Transfers In BMC) देण्यात आलं आहे.

मुंबई महापालिका आयुक्तांनाचीच नाही तर अतिरिक्त आयुक्त, मदत व पुनर्वसन सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग सचिवांचीही बदली करण्यात आली आहे. (IAS Transfers In BMC)

कोणाकोणाची बदली, कुणाची बदली कुठे?

  • नगरविकास खात्याचे प्रधान सचिव इक्बाल सिंह चहल मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी

  • मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांना नगरविकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिवपद
  • ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जैस्वाल यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक

  • मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांची मदत व पुनर्वसन सचिवपदी बदली
  • मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांची सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव म्हणून बदली

  • सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव मनोज सौनिक यांना वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवपद
  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माजी व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती

  • जयश्री बोस आता महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी

IAS Transfers In BMC

कोण आहेत इक्बाल चहल?

  • इक्बाल चहल हे 1989 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत
  • सध्या इक्बाल चहल हे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव आहेत
  • इक्बाल चहल यांनी यापूर्वी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिलं आहे
  • इक्बाल चहल हे शारिरिकदृष्ट्या फिट अधिकारी म्हणून ओळखले जातात
  • इक्बाल चहल हे 2004 पासून सलग मुंबई मॅरोथॉनमध्ये सहभागी होतात.

कोण आहेत प्रवीण परदेशी?

  • प्रवीण परदेशी हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
  • त्यांनी मे 2019 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा भार स्वीकारला होता.
  • प्रवीण परेदशी हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी असल्याचं सांगण्यात येतं
  • परदेशींनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे.
  • फडणवीसांच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, वन, पर्यावरण, अर्थ, नगर विकास व महसूल अशा विविध विभागांत जबाबदारी सांभाळलेली आहे.
  • 1993 मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला होता तेव्हा परदेशी लातूरचे जिल्हाधिकारी होते.
  • तेव्हा त्यांनी जो कामाचा धडाका दाखवला होता त्याची मोठी प्रशंसा झाली होती.
  • देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लगेचच परदेशी यांना आपल्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी आणले होते.
  • परदेशी यांच्यावर फडणवीस यांनी नेहमीच विश्वास दाखवला होता.
  • पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

IAS Transfers In BMC

संबंधित बातम्या :

धारावी कोळून प्यायलेला अधिकारी मुंबई महापालिका आयुक्तपदी, कोण आहेत इक्बाल चहल?

ठाकरे सरकारला उत्तर देता येत नाही म्हणून प्रवीण परदेशींना बळीचा बकरा बनवला : किरीट सोमय्या

BMC commissioner transferred | मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशींना हटवलं

BMC commissioner transferred | मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशींना हटवलं

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.