जेव्हा तुकाराम मुंडे म्हणतात, ‘हे खरं यश आहे!’
गडचिरोली जिल्ह्याचं जिल्हा सामान्य रुग्णालय (Gadchiroli District Government Hospital) संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलं आहे.
मुंबई : गडचिरोली जिल्हा तसा फारच दुर्गम जिल्हा… अनेक वर्ष अनेक विकासकामं रखडलेल्या अवस्थेत… अनेक वेळा तिथल्या रुग्णांना दवाखान्यात जायचं म्हटलं तर जंगलातून काट्या-कुट्यातून वाट काढत जावे लागते. मात्र आता याच गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलं आहे. याच रुग्णालयाचं आणि ज्यांनी हे रुग्णालय उभारण्यात मोलाची भूमिका बजावली त्या जिल्हाधिकाऱ्यांचं आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी कौतुक केलं आहे. ‘हेच खरे यश…’ म्हणून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. (IAS Tukaram Mundhe Tweet Over Gadchiroli District Government Hospital)
तुकाराम मुंढे यांचं ट्विट
हे गडचिरोलीचं जिल्हा रुग्णालय आहे यावर विश्वास ठेवा… अतिशय प्रेरणादायी आणि ग्रेट वर्क असं ट्विट करत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचं अभिनंदन करत तुकाराम मुंढे यांनी त्यांची तारीफ केली आहे.
Believe it, it’s Government Hospital, Gadchiroli. Inspirational work ! Great work@DeepakSingla161, to transform District Hospital , Gadchiroli. Team Gadchiroli ? pic.twitter.com/3tsiM3Vexa
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) February 8, 2021
हा खरा मोलाचा वाटा… हे खरं यश… हे यश सर्व क्षेत्रांत मिळवण्यासाठी सर्वच स्तरांवर सहकाऱ्यांच्या प्रयत्नांची पराकष्ठा आवश्यक आहे, असंही ट्विटमध्ये तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.
This is Real contribution, Real Success . To make it happen in all walks of life , (not limited to islands of Excellence ! ) requires collaborative efforts at all levels .
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) February 8, 2021
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात शिरल्यावर एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शिरल्याचा भास होतो. इतकं देखणं आणि सुसज्ज रुग्णालय गडचिरोलीमध्ये उभं राहिलंय. हे रुग्णालय उभं करण्यात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचं योगदान मोठं आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली टीमने या हॉस्पिटलसाठी जीवापाड मेहनत घेतली. अखेर काहीच दिवसांपूर्वीच गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रुग्णालयातील आयसीयू कक्षाचं उद्घाटन पार पडलं.
गडचिरोलीचं सुसज्ज आयसीयू
गडचिरोलीच्या आयसीयूमध्ये 12 फुल्ल अॅटोमॅटिक बेड आहेत. या कक्षात व्हेंटिलेटरवर, सेंटर मॉनिटर, बेडसाईज मॉनिटर, सेंटर सक्सेम, टेली आसीयू मशीनही लावण्यात आली आहे. या सुविधेने गडचिरोलीतून थेट दिल्ली किंवा इतर कुठेही उपचारादरम्यान तज्ञ्जांचा सल्ला घेता येणार आहे.
या आईसीयूमध्ये मॉड्यूलर ऑपरेशन थेटर, लेबर रूम आणि ओटी, स्वतंत्र वैद्यकीय अधीक्षक कक्ष स्टाफ रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. इथे 5 फिजिशियन डॉक्टर तर 12 स्टाफ नर्सची टीम असणार आहे. या अत्याधुनिक आयसीयुला लक्स कार्यक्रमांतर्गत नॅशनल सर्टीफाईड देखील देण्यात आलं आहे. हा अत्याधुनिक कक्ष केवळ आठ महिन्यात उभा केला गेला आहे.
(IAS Tukaram Mundhe Tweet Over Gadchiroli District Government Hospital)
हे ही वाचा :
संसाराचा गाडा आणि ग्रामपंचायतीचा कारभारही सोबतीने, सरपंचपदी पती, उपसरपंच पत्नी