मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झाले तर हेच बिल्डर्स दोषी असतील, झिशान सिद्दीकी यांचा आरोप
बिल्डरांचा त्यात सहभागच नव्हता असं चार्जशीटमध्ये उद्या म्हटलं जाईल. पण तुम्हाला सांगतो माझ्या वडिलांची हत्या फक्त फक्त भेकड लोकच करू शकतात. स्मोक बॉम्ब फोडून असे एखाद्याला उडविण्याचे काम असे नेभळट लोकच करू शकतात. त्यांनी जे करायचं होतं ते समोरासमोर मर्दासारखं करायचं होतं ना असेहील झिशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे.
![मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झाले तर हेच बिल्डर्स दोषी असतील, झिशान सिद्दीकी यांचा आरोप मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झाले तर हेच बिल्डर्स दोषी असतील, झिशान सिद्दीकी यांचा आरोप](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/baba-siddique-and-zishan-siddique.jpg?w=1280)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गेल्यावर्षी १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील त्यांच्या कार्यालयासमोरच बिष्णोई गँगच्या गुंडानी हत्या केली होती. त्यानंतर या प्रकरणात कोर्टात चार्जशिट दाखल करण्यात आली आहे.या आरोपपत्रावरुन त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केले आहेत. आपण ज्या बिल्डर्सची संशयित म्हणून नावे घेतली होती. त्यातील एकाचीही मुंबई पोलिसांनी साधी चौकशी देखील केलेली नाही. उद्या माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर या लोकांनी हल्ले केले तर पोलिस बिल्डर्सना पुन्हा निर्दोष सोडतील अशी मला खात्री आहे असे बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी याने म्हटले आहे.
झिशान सिद्दीकी पुढे म्हणाले की मी नेहमीच सांगितले की, ज्या पद्धतीने चौकशी होत आहे. तसे काही झालेले नाही. मी अर्धी चार्जशीट वाचली आहे. मी निराश झालो आहे. ज्या पद्धतीने चौकशी झाली त्यावर मी निराश आहे. आम्ही अनेक नावं घेतली होती, आम्ही जी जी नावे घेतली होती, त्या नावांची चौकशी केली नाही. गोळीबार करण्यापूर्वी स्मोक बॉम्ब फुटला होता असं सांगितलं जाते. पण हे भेकडाचं काम आहे. समोर उघडपणे हल्ला करणार नाही. हे मर्दांचं काम नाही. भेदरलेल्या लोकांचे कृत्य आहे. आणखी काय होणार ? माझ्याही जीवाला धोका आहे. जास्तीत जास्त काय करतील मला मारतील. माझ्या कुटुंबाला आणि माझ्या केसालाही धक्का लागला तर मी जी जी नावे घेतली आणि काही बिल्डरांचीही नावे घेतली ते सर्व याला जबाबदार असतील आणि पोलिस त्यांना देखील निर्दोष सोडतील अशी भीतीही सिद्दीकी यांनी व्यक्त केली.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/IIFL.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/pune-cricket-stadium.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/bangladesh-flag-1.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/GBS-OUTBREAK-IN-PUNE.jpg)
पोलिसांना कोर्टात उत्तर द्यावे लागेल ?
मी ज्यांची नावे घेतली, ती सर्व नावे पोलिसांकडे आहेत. पण मला आश्चर्य याचं आहे की पोलिसांनी यापैकी कुणाचीही साधी चौकशी केलेली नाही. त्याचे उत्तर पोलिसांना कोर्टात द्यावे लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यांचे उत्तर द्यावं लागेल. पोलिसांनी या लोकांची चौकशी का केली नाही असं सीएम विचारतील. मी काही आमदार नाही. त्यामुळे माझं सरकार नाही. मी एक कार्यकर्ता आहे. मला जे वाटतं ते मी माझे नेते अजितदादांना सांगेल. सीएम, अजितदादा, एकनाथ शिंदे हे चांगली चौकशी करतील असे वाटते. माझ्या जीवाला धोका झाला तर त्याला बिल्डरच जबाबदार असेल. मी पोलिसांना सांगितलं. आता जर चौकशी होत नसेल तर मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेची खिल्ली उडवल्यासारखं होईल असेही झिशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे.