‘आम्ही लॉ मेकर, तोंड उघडलं तर केंद्रात हादरे बसतील, संजय राऊतांचा हल्लाबोल’

गेल्या वर्षभरापासून भाजपमधील काही महत्त्वाचे नेते आणि त्यांचे हस्तक सातत्याने मला भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. | Sanjay Raut

'आम्ही लॉ मेकर, तोंड उघडलं तर केंद्रात हादरे बसतील, संजय राऊतांचा हल्लाबोल'
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 2:51 PM

मुंबई: आम्हाला नोटीस पाठवा अथवा अटक करा. तुम्ही आमचे काहीही करू शकत नाही. आमच्यावर कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी हे सरकार पडणार नाही, अशा शब्दांत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांना ठणकावले. मी माझ्या सगळ्या संपत्तीचा तपशील देऊ शकतो. माझ्याकडेही तुमच्या मुलाबाळांच्या संपत्तीचे हिशेब आहेत. मी तोंड उघडलं तर केंद्रातील सरकारला हादरा बसेल. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कोणाच्याही मुलाबाळांपर्यंत जायचे नाही, असे सांगितले आहे. बाळासाहेबांचीही तशीच शिकवण आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. (Sanjay Raut press conference in Mumbai after ED notice)

ते सोमवारी मुंबईच्या शिवसेना भवन येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला. राजकीय विरोधकांना संपवता येत नाही. तेव्हा ईडी, सीबीआय आणि आयकर यासारखी हत्यारे वापरली जातात. आतापर्यंत भाजपने सरकार बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रमुख लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते दबावाला बळी पडत नाहीत हे समजल्यामुळे आता हे कागदाचे तुकडे पाठवण्यात आल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

‘भाजपचे तीन बडे नेते अनेक दिवसांपासून ईडीच्या कार्यालयात जातायत’

गेल्या वर्षभरापासून भाजपमधील काही महत्त्वाचे नेते आणि त्यांचे हस्तक सातत्याने मला भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून मला वेळोवेळी राज्यातील सरकार टिकू देऊ नका, सरकार पाडा, असे संदेश देण्यात आल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. या लोकांकडून मला एक यादी दाखवण्यात आली. यामध्ये काही जवळच्या लोाकांचा आणि राष्ट्रवादी व काँग्रेसमधील नेत्यांचा समावेश होता. या सर्वांना ईडी अटक करणार, असे मला सांगण्यात आले. प्रताप सरनाईक हे केवळ टोपण आहे यादीतील नेत्यांचे राजीनामे घेतले जातील, असेही मला धमकावण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी ‘ईडी’कडून चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सोमवारी मुंबईच्या शिवसेना भवनात पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे तीन नेते सातत्याने ईडीच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. माझ्याकडे या सगळ्याचे पुरावे आहेत. कालपासून भाजपची माकडं उड्या मारत आहेत. पीएमसी बँक प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती त्यांना कोणी दिली. ईडीच्या कार्यालयात बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश नसतो. मग ही माहिती बाहेर कशी आली. ईडीच्या कार्यालयात भाजपसाठी टेबल टाकण्यात आला आहे की ईडी भाजपच्या कार्यालयात बसायला लागली आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

‘बायकांच्या पदराआडून लढण्याचा डाव तुमच्यावरच उलटेल’

बायकांच्या पदराआडून लढण्याचा भाजपचा डाव त्यांच्यावर उलटेल. भाजपला वैफल्य आणि हतबलता आल्यामुळे हे सर्व केले जात आहे. मात्र, घरातील महिलांवर आणि मुलांवर हल्ले करणे म्हणजे नामर्दानगी आहे. हे सर्व असेच सुरु राहिले तर शिवसेनेकडूनही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल. ईडीची नोटीस म्हणजे ब्रह्मवाक्य नव्हे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

संबंधित बातम्या :

ईडीचा धाक दाखवत 22 आमदारांचे राजीनामे घेऊन सरकार पाडण्याचा डाव; राऊतांचा मोठा आरोप

ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

शिवसैनिक सुसाट, ED ऑफिसवर BJP चे बोर्ड लावले

(Sanjay Raut press conference in Mumbai after ED notice)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.