महापालिका निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी, मंगळवारी राज्यस्तरीय बैठक

मंगळवारी मनसेची महत्वाची राज्यस्तरीय बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता वांद्रेतील MIG क्लब इथं ही बैठक होणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी, मंगळवारी राज्यस्तरीय बैठक
Raj Thackeray. (File Photo: IANS)
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 2:15 PM

मुंबई: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मंगळवारी मनसेची महत्वाची राज्यस्तरीय बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता वांद्रेतील MIG क्लब इथं ही बैठक होणार आहे. यावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांना आपल्याकडील अहवालाच्या स्वरुपात पक्षाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Important meeting of MNS on Tuesday on the backdrop of BMC elections)

स्थानिक स्तरावरील निवडणुका आणि पक्षाची तयारी, पक्ष संघटन आणि बांधणी, स्थानिक स्तरावर राजकीय आणि सामाजिक स्थिती, लोकांचा कल, पक्षात रिक्त असलेल्या पदांच्या नियुक्त्या याबाबत पदाधिकाऱ्यांनी लेखी अहवाल पक्षाला देण्याची सूचना देण्यात आली आहे.

मंनसे अध्यक्ष राज ठाकरे सक्रिय

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत कृष्णकुंजवर बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये राज ठाकरे विविध जिल्ह्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत आहेत. सोबतच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना देत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा जोमाने उतरेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

नाशिक महापालिकेत कमबॅक करण्यासाठी मनसे सज्ज

आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मनसेकडून कम बॅक करण्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. मनसेच्या जुन्या आणि निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी 7 डिसेंबरला ‘कृष्णकुंज’वर जात राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी राज ठाकरे यांनी नाशिक मनसेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी नवीन वर्षात नाशिक दौरा करणार असल्याचे सांगितल्यानं मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेना-काँग्रेस वाद शिगेला

मुंबई महापालिकेत शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद शिगेला पोहोचला आहे. त्यात आता महापालिकेच्या चिटणीस विभागानं नगरसेवकांना पाठवलेल्या स्मरणपत्राची भर पडली आहे. महापालिकेच्या ऑनलाईन सभांमध्ये अनुपस्थित राहिल्यास अपात्र ठरण्याची वेळ येऊ शकते, असं स्मरणपत्र पाठवण्यात आल्यानं दोन्ही पक्षात पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मुंबई महापालिकेच्या चिटणीस विभागानं विविध पक्षातील सात नगरसेवकांना पत्र पाठवलं आहे. त्यावरुन पालिकेतील चिटणीस विभागाला हाताशी धरुन पालिकेत काँग्रेसला अडचणीत आणले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

संबंधित बातम्या:

राज ठाकरेंसोबत मनसेच्या 50 पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक, पक्षात मोठ्या बदलाचे संकेत

महाविकास आघाडीला शह देण्याचा प्लॅन, नाशिक सभापती निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र येण्याची चिन्हं

Important meeting of MNS on Tuesday on the backdrop of BMC elections

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.