वाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिने लायसन्स रद्द

मुंबई: वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार आहे. वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्यास 3 महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होणार आहे. वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक यांनी याबाबत संबंधित विभागाला कारवाईचे निर्देश दिले. यानुसार सिग्नल न पाळल्यास, वेग मर्यादा ओलांडली तर, क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहनात भरल्यास किंवा वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास 3 महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स […]

वाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिने लायसन्स रद्द
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई: वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार आहे. वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्यास 3 महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होणार आहे. वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक यांनी याबाबत संबंधित विभागाला कारवाईचे निर्देश दिले.

यानुसार सिग्नल न पाळल्यास, वेग मर्यादा ओलांडली तर, क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहनात भरल्यास किंवा वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास 3 महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होणार आहे. त्यामुळे यापुढे वाहनचालकांना काटेकोरपणे वाहतुकीचे नियम पाळावेच लागणार आहेत.

रस्ता सुरक्षा समितीच्या नवी दिल्ली येथील 12 नोव्हेंबर रोजीच्या आढावा बैठकीला राज्याचे मुख्य सचिव उपस्थित होते. यावेळी राज्यातील अपघात आणि अपघातांमधील जखमी-मृतांचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच पोलीस विभागातर्फे वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांचे ड्राईव्हिंग लायसन्स निलंबित करण्यासाठी परिवहन कार्यालयास पाठविण्यात आलेली प्रकरणे अत्यंत नगण्य असल्याने समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ट्रॅफिकचे नियम पाळा, अन्यथा लायसन्स रद्द :

-मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे

-सिग्नल न पाळणे

-क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे,

-मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे

-दारु पिऊन वाहन चालवणे,

-वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.