लोकलमध्ये तरूणीला ह्दयविकाराचा झटका, टीसींनी वाचविले प्राण

महिला टीसी दीपा वैद्य आणि जैन मार्सेला या दोघींनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने या तरुणीचे प्राण बचावल्याने या दोघींच्या कर्तव्यतत्परतेचे कौतूक केले जात आहे.

लोकलमध्ये तरूणीला ह्दयविकाराचा झटका, टीसींनी वाचविले प्राण
airoli (1)Image Credit source: airoli (1)
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 12:09 PM

मुंबई : नवीमुंबईच्या ऐरोली येथून लोकल पकडणाऱ्या एका 19 वर्षीय कॉलेज तरूणीला लोकलमध्ये ह्दयविकाराचा सौम्य झटका आला. ही कॉलेज तरूणी लोकलच्या गर्दीत चक्कर येऊन पडली. त्याचवेळी ड्यूटीवर असलेल्या मध्य रेल्वेच्या दोन महिला टीसींनी प्रसंगावधान दाखवित मदत केल्याने वेळीच उपचार मिळून या तरूणीचे प्राण बचावल्याची घटना काल घडली.

महिला टीसी दीपा वैद्य आणि जैन मार्सेला या दोघींनी तातडीने ठाणे स्थानकात फोन करून फलाट क्रमांक एकवर  वैद्यकीय पथक तयार ठेवले. ठाणे स्थानकात तातडीने व्हीलचेअर बोलावून या तरूणीला प्राथमिक उपचार देण्यात आले. परंतू या तरूणीचे प्रकृती बिघडल्याने जीआरपी पोलीस आणि प्रवाशांच्या मदतीने या तरूणीला ठाण्यातील रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या तरूणीला ह्दयविकाराचा आजार असल्याने तिला त्यानंतर सिव्हील रुग्णालयात आसीयूमध्ये दाखल केले गेले. या तरूणीला ह्दयविकाराचा सौम्य झटका आल्याचे स्पष्ट झाल्याने तिच्यावर वेळीच शस्रक्रीया झाल्याने या तरूणीचे प्राण बचावले.

महिला टीसी दीपा वैद्य आणि जैन मार्सेला या दोघींनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने या तरुणीचे प्राण बचावल्याने या दोघींच्या कर्तव्यतत्परतेचे कौतूक केले जात आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.