विरारमध्ये समाजकंटकांचा हैदोस, रात्री-अपरात्री घरांवर दगडफेक

विजय गायकवाड, टीव्ही 9, विरार (पालघर) : विरार पूर्वेकडील कारगील नगर परिसरात सध्या दहशतीचं वातावरण आहे. रात्री-अपरात्री कारगील नगरमधील चाळींवर अज्ञात लोक दगडफेक करत असल्याचा प्रकार काही दिवसांपासून घडतो आहे. त्यामुळे इथले रहिवासी अक्षरश: जीव मुठीत घेऊन जगत आहेत. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या समाजकंटकांना शोधण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. नेमका काय प्रकार […]

विरारमध्ये समाजकंटकांचा हैदोस, रात्री-अपरात्री घरांवर दगडफेक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

विजय गायकवाड, टीव्ही 9, विरार (पालघर) : विरार पूर्वेकडील कारगील नगर परिसरात सध्या दहशतीचं वातावरण आहे. रात्री-अपरात्री कारगील नगरमधील चाळींवर अज्ञात लोक दगडफेक करत असल्याचा प्रकार काही दिवसांपासून घडतो आहे. त्यामुळे इथले रहिवासी अक्षरश: जीव मुठीत घेऊन जगत आहेत. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या समाजकंटकांना शोधण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. नेमका काय प्रकार आहे? कारगील नगरमधील ‘जय जीवदानी संकुल’ आणि ‘ओम नम: शिवाय’ या दोन चाळीत शंभराहून अधिक कुटुंबं राहतात. अनेकांच्या घरावर दगड पडल्याने पत्रे तुटून दगड घरात पडले आहेत. रात्री-अपरात्री होणाऱ्या या दगडाच्या वर्षावामुळे परिसरातील रहिवाशी सध्या दहशतीच्या वातावरणात आहेत. दिवाळी तोंडावर आली. मात्र अजूनही हा प्रकार थांबलेला नाही. लहान मुलांमध्ये तर सर्वाधिक दहशतीचं वातावरण आहे. सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत. दगडफेकीच्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणं मुश्किल होऊन बसलं आहे. विरार पूर्वेकडील मनवेल पाडा, कारगील नगर या भागात अनेक अनाधिकृत बांधकामं आहेत. या परिसरात लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. आता चाळींवर पडणाऱ्या दगडांची तक्रार दाखल झाल्याने पोलिसांनी गस्त वाढवली आहे. कारगील नगर परिसरात अमली पदार्थांचे सेवन करणारे रात्रीच्या वेळी वावरत असतात. त्यामुळे येथील राहिवाशाना त्यांचाही खूप त्रास होतो. गस्त वाढवण्याची मागणी करुनही पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नाहीत, अशी तक्रारही स्थानिक लोकप्रतिनिधींची आहे. विरारमध्ये रात्री उशिरा कामावरुन परतणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत कारगील नगरमध्ये घडणाऱ्या घटना आणखी चिंता वाढवणाऱ्या ठरतात. त्यामुळे या रोखण्यासाठी तातडीने पावलं उचलण्याची गरज आहे.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.