Sachin Vaze arrested : 6 मोठी कलमं, सचिन वाझेंना नेमकं कोणत्या प्रकरणात अटक?

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटेलिया या आलिशान बंगल्यासमोर (Antilia Bunglow) स्फोटक प्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sacin Vaze) यांना अटक केलीय.

Sachin Vaze arrested : 6 मोठी कलमं, सचिन वाझेंना नेमकं कोणत्या प्रकरणात अटक?
sachin waze
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 1:24 AM

मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटेलिया या आलिशान बंगल्यासमोर (Antilia Bunglow) स्फोटक प्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sacin Vaze) यांना अटक केलीय. त्यामुळेच एकच खळबळ उडालीय. एनआयएने तब्बल 13 तास चौकशी केल्यानंतर सचिन वाझेंना अटक करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे एनआयएला सचिन वाझेंविरोधात काही तरी सबळ पुरावा मिळाला असावा, असा अंदाज बांधला जातोय. या प्रकरणी इतरही अनेक नावं समोर येण्याची शक्यता आहे (In which case API Sachin Vaze arrested by NIA What are IPC sections).

सचिन वाझेंवर मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आणि स्फोटकांच्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी देखील आरोप होत आहेत. त्यापैकी एनआयए सध्या अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास करत आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार एनआयएने अंबानी स्फोटक प्रकरण राज्याकडून आपल्याकडे हस्तांतरीत केलंय. याच प्रकरणी एनआयए कसून तपास करतेय. एनआयएने सचिन वाझेंवर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्यावर अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी उभी करण्यात सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. वाझेंविरोधात भारतीय दंड संहितेनुसार (IPC) दाखल गुन्हे खालीलप्रमाणे,

  1. भारतीय दंड संहिता कलम 286 – जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटकं बाळगणे, इतरांच्या जीवाला धोका होईल असं वर्तन करणे,
  2. भारतीय दंड संहिता कलम 465 – खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे ( या गुन्ह्यात तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते)
  3. भारतीय दंड संहिता कलम 473 – दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृती
  4. भारतीय दंड संहिता कलम 506(2) – दहशत निर्माण करणं किंवा धमकी देणे
  5. भारतीय दंड संहिता कलम 120 B – गुन्हेगारी स्वरुपाच्या षडयंत्रात सहभाग घेणे
  6. स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब – स्फोटकं बाळगणे

विशेष म्हणजे सचिन वाझेंनी याआधीच न्यायालयात धाव घेत अंतरिम जामीनासाठी प्रयत्न केले होते. मात्र, न्यायालयाने प्रथमदर्शी अर्जदाराविरोधात पुरावे दिसत असल्याचं निरिक्षण नोंदवलं. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचं म्हणत हा जामीनाचा अर्ज फेटाळला. यावेळी न्यायालयाने तपास संस्थांचं मत महत्त्वाचं असल्याचं म्हटलं.

संबंधित बातम्या :

Sachin Vaze Arrested by NIA: अखेर API सचिन वाझे यांना अटक, 13 तासांच्या झडतीनंतर बेड्या

एटीएसने मनसुख यांच्या वकिलाचा जबाब नोंदवला, के. एच, गिरींकडून वाझेंबाबत मोठे गौप्यस्फोट

सचिन वाझे नैराश्यात का?; व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सचं कारण समोर?

व्हिडीओ पाहा :

In which case API Sachin Vaze arrested by NIA What are IPC sections

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.